... चॅटिंग ...
Priyu19 : हाय 👋🏻.. झोपला नाहीस अजून?
1.00 AM
Sam96 : नाही यार अजून जेवण बाकी आहे. 😕
1.00 AM
Priyu19 : का? अजून का जेवला नाहीस ?
1.00 AM
Sam96 : मॉम डॅड पार्टीला गेलेत.. मी संध्याकाळी जाम हादडलेलं, अजून भूक हवी तशी लागली नाही.
1.01 AM
Priyu19 : असा काय तू ही का वेळ झाली का जेवायची 😳?
1.01 AM
Sam96 : मग ही काय वेळ झाली का विचारायची??
J1 झालं का? 😆😀🤣
1.01 AM
Priyu19 : डोंट बी ओव्हरस्मार्ट हं.. 😏
ऐक ना रुप्सने मला काहीतरी सांगितलं ☺
1.01 AM
Sam96 : अच्छा?? 😁 काय सांगितलं? ☺
1.02 AM
Priyu19 : शहाणपणा नको दाखवू, तुला माहीत आहे मी कशाबद्दल बोलतेय 🙄
1.03 AM
Sam96 : खरंच नाही माहीत, तुमच्या मुलींमध्ये काय चालतं ते आम्हा मुलांना कसे समजणार बुवा? 😁
1.03 AM
Sam96 : ए.. तुझे नेटवर्क बरोबर नाही का? डिलीवर व्हायला किती वेळ लागतोय 😣
1.03 AM
Priyu19 : हो यार.. दोन दिवसांपासून गडबड चाललीय, माझ्या रुममध्येच रेंज नाही व्यवस्थीत. वेट मी गॅलरीत जाते. ☺
1.04 AM
Sam96 : फुकटचं नेटवर्क वापर अजून.. खाओ पिओ ऐश करो 🤣😆
1.04 AM
Priyu19 is Typing....
Priyu19 : बास हां... 😏 बोल आता, सांग तू पटकन 😍
1.05 AM
Sam96 is Typing....
Sam96 : अरे खरंच माहीत नाही... मला काय माहीत रुप्सने तुला काय सांगितलं ते? 😬
1.05 AM
Priyu19 is Typing
...
....
.....
Sam96 : निबंध लिहितेस की काय? 😁
1.06 AM
..
Priyu19 is Typing...
..
..
Priyu19 :अरे इथे कंपाउंड मध्ये कोणीतरी आहे...
ब्लॅक जॅकेट घातलंय त्याने..
मला पाठमोरा आहे आणि ढोपरांवर बसून जमिनीत काही तरी शोधतोय.. 😧
1.06 AM
Sam96 : 😆😆 बरी आहेस ना? इतक्या रात्री कोण कशाला येईल तुमच्या गार्डन मध्ये? तुला झोप आलीय का? की विषय बदलतेस??
जाऊ दे नको सांगू रुप्स ने काय सांगितलंय ते 😆
1.07 AM
Priyu19 is Typing...
..
...
...
Priyu19 : हे वेट... सॅम तो तूच आहेस 😠
काय करतोयस तिथे तू?
1.08 AM
Sam96 : व्हॉट 🤣🤣
मी??
जा झोप तू, तूला भास होताहेत कसले कसले. 😆
1.08 AM
Priyu19 : खोटं बोलू नकोस... 😠
आपल्या जीटूजी च्यावेळचे जॅकेट घातलेले आहेस तू.
त्यावरचे नावही दिसतंय
"Sameer.. हवां का झोंका "
1.09 AM
Sam96 : ए उगाच काहीतरी बडबडू नको.. मी घरी बेडवर आहे आणि तू म्हणतेस थे जॅकेटसुद्धा कपाटाच्या कोपऱ्यात कुठे तरी पडले असेल. 😣
1.10 AM
Priyu19 is Typing..
..
..
..
Priyu19 : अरे खरं सांग ना.. तो तूच आहेस ना? उगाच घाबरवू नकोस. 😕
1.10 AM
Sam96 is Typing..
..
Sam96 : काय फालतूगीरी आहे राव? 😟
मी कशाला येईन तिकडे रात्री एक वाजता कडमडायला? 😠
1.11 AM
Priyu19 : बापरे.. 😟
1.11AM
Sam96 : आता काय झालं? 😠
1.11 AM
Priyu19 : तो काहीतरी खोदतोय 😳 ... तेही हातानेच..
कोणतंही हत्यार न वापरता
जमीनीवर मोठा खड्डा केलाय त्याने.. 😳
1.12 AM
Sam96 is Typing..
...
...
Sam96 : खोदतोय? 😳 ते ही हाताने?? आर यू शुअर?
1.12 AM
Priyu19 is Typing...
...
..
..
.
Priyu19 : सॅम त्याने माझ्याकडे वळून पाहीलं... तो तूच आहेस 😧
नक्की तूच.. का घाबरवतोय मला तू? 😟
1.13 AM
Sam96 : अरे यार... मी नाहीए तो.. मी घरीच आहे
वेट मी तुला सेल्फी पाठवतो...
1.13 AM
Priyu19 is Typing..
......
.....
...
..
Priyu19 : सॅम तो घराकडे येतोय... 😧
मला भिती वाटतेय.. प्लीज ओ गॉड सेव मी..
त्याच्या हातात काहीतरी चमकलं... सुरा आहे बहुतेक 😳
1.14 AM
Sam96 is Typing
..
..
Sam96 : आर यू किडींग ऑर व्हॉट? 😠
आता तर त्याच्याकडे काही नव्हते हत्यार वगैरे...
1.14 AM
Sam96 : ( IMG )
1.14 AM
Priyu19 is Typing..
..
.
Sam96 : चेक द सेल्फी.. मी घरीच आहे बेडवर 😠
1.14 AM
Priyu19 : ओ.. गॉड.. सॅम तो मला मारायला येतोय.. हातातला सुरा उंचावून मला त्याने दाखवला.. ही गॉना किल मी.. प्लीज डू समथींग सॅम 😣
1.14 AM
Sam96 is Typing..
..
..
Sam96 : ओह इट्स लुक्स हॉरीबल.. मी निघतोय घरुन. यायला दहा मिनीटे लागतील.. तोवर तू कुठेतरी लपून रहा कपाटात वगैरे आणि ऐक..
फोन सायलेंट करुन ठेव.. आणि ऑनलाईनच रहा म्हणजे लक्षात येईल मला की तू कुठे आहेस वगैरे. जवळपास काही हत्यार वगैरे असेल तर घेऊन ठेव. डोंट वरी.. आय विल बी देअर इन टेन मिनीट्स.. 👍🏻
1.16 AM
Priyu19 : सॅम त्याने दरवाजा तोडला.. जोरजोरात घाव घालून.. 😦
ओके. मी माझ्या रुममधल्याच कपाटात लपतेय. तू लवकर ये प्लीज.
1.16 AM
Sam96 Offline...
Priyu19 : सॅम लाईट गेले.. त्यानेच घालवले असणार..
😲
1.19 AM
Priyu19 : सॅम.. लुक्स लाईक ही इज अॅट माय बेडरुम डोअर.. लवकर ये तू.. प्लीज
1.22 AM
Priyu19 : तो बेडरुमचा दरवाजा तोडतोय सॅम.. मला भरपूर भिती वाटतेय.. कुठे आहेस तू सॅम..
प्लीज
ऑनलाइन ये... सॅम..
1.25 AM
Priyu19 : सॅम ही इज इन बेडरुम..
मला त्याची हालचाल जाणवतेय. तो शोधतोय मला. माझ्या हातात बॅट आहे... जर त्याने कपाटाचा दरवाजा उघडला तर मी त्याला मारणार.. त्याने मला मारण्याआधी.. 😧
1.29 AM
Sam96 Online
Sam96 is Typing..
Sam96 : व्हॉट द हेल इज दॅट?? तूझा दरवाजा तर ठिक ठाक आहे.. आर यू मेकिंग फन ऑफ मी प्रियू?? 😠
1.30 AM
Priyu19 Offline
..
Priyu19 Online
Priyu19 is Typing...
..
..
Priyu19 : नो वे.. वर ये बेडरुममध्ये.. तो बेडरुम मध्येच आहे.. शोधतोय मला बेडरुमचा दरवाजा नक्कीच तोडलाय त्याने..
1.32 AM
Sam96 is Typing..
..
..
Sam96 : ओह इट्स लुक्स हॉरीबल.. मी निघतोय घरुन. यायला दहा मिनीटे लागतील.. तोवर तू कुठेतरी लपून रहा कपाटात वगैरे आणि ऐक..
फोन सायलेंट करुन ठेव.. आणि ऑनलाईनच रहा म्हणजे लक्षात येईल मला की तू कुठे आहेस वगैरे. जवळपास काही हत्यार वगैरे असेल तर घेऊन ठेव. डोंट वरी.. आय विल बी देअर इन टेन मिनीट्स.. 👍🏻
1.16 AM
Priyu19 : सॅम त्याने दरवाजा तोडला.. जोरजोरात घाव घालून.. 😦
ओके. मी माझ्या रुममधल्याच कपाटात लपतेय. तू लवकर ये प्लीज.
1.16 AM
Sam96 Offline...
Priyu19 : सॅम लाईट गेले.. त्यानेच घालवले असणार..
😲
1.19 AM
Priyu19 : सॅम.. लुक्स लाईक ही इज अॅट माय बेडरुम डोअर.. लवकर ये तू.. प्लीज
1.22 AM
Priyu19 : तो बेडरुमचा दरवाजा तोडतोय सॅम.. मला भरपूर भिती वाटतेय.. कुठे आहेस तू सॅम..
प्लीज
ऑनलाइन ये... सॅम..
1.25 AM
Priyu19 : सॅम ही इज इन बेडरुम..
मला त्याची हालचाल जाणवतेय. तो शोधतोय मला. माझ्या हातात बॅट आहे... जर त्याने कपाटाचा दरवाजा उघडला तर मी त्याला मारणार.. त्याने मला मारण्याआधी.. 😧
1.29 AM
Sam96 Online
Sam96 is Typing..
Sam96 : व्हॉट द हेल इज दॅट?? तूझा दरवाजा तर ठिक ठाक आहे.. आर यू मेकिंग फन ऑफ मी प्रियू?? 😠
1.30 AM
Priyu19 Offline
..
Priyu19 Online
Priyu19 is Typing...
..
..
Priyu19 : नो वे.. वर ये बेडरुममध्ये.. तो बेडरुम मध्येच आहे.. शोधतोय मला बेडरुमचा दरवाजा नक्कीच तोडलाय त्याने..
1.32 AM
Sam96 : प्रियू मी घरातच आहे तुझ्या.. इथे कुठेही तोडफोडीचे नामोनिशाण नाहीए..
आलो बेडरुममध्ये.. वेट 👍🏻
1.32 AM
Priyu19 : सॅम आय थिंक ही फाऊंड मी.. तो हातातल्या सुऱ्याने कपाटाचा दरवाजा उघडतोय 😬
प्लीज सेव मी...
1.32 AM
Sam96 is Typing..
.....
...
..
Sam96 : प्रियू तू कुठे आहेस? मी बेडरुम मध्येच आहे तुझ्या.. इथे तर कोणीच नाहीए.. कपाट तर सताड उघडं आहे.. आणि तू ऑनलाईन सुद्धा आहेस.. काय चाललंय हे??
1.33 AM
Priyu19 Offline...
Priyu19 Online
..
Priyu19 is Typing
...
..
.
Priyu19 : मी बाथरुम मध्ये टाकीच्या मागे लपलीय तो सुध्दा बाथरुम मध्येच आहे. प्लीज सेव मी सॅम त्याच्या हातातला चाकू रक्ताने भरलाय..
1.35 AM
Sam96 : WTF... ही कोणीची डेडबॉडी आहे? प्रियू कुठे आहेस तू? 😠
तुझ्या घरी खून झालाय कोणाचा तरी.. 😳
1.40 AM
Sam96 : हे प्रियू व्हेअर आर यू??
ही तर रुप्स आहे..
आय अॅम कॉलिंग पुलीस नाऊ..
1.45 AM
Priyu19 Offline
.....
........
"हॅलो पोलिस स्टेशन.. मी प्रिया पाटील बोलतेय.. आमच्या घरात खून झालेत..
हो..
दोन खून..
नाही माहीत...
मी आता बाहेरुन आले तर दरवाजा उघडा होता. बाथरुम मध्ये दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेत...
हो
ओळखते...
एक माझी मैत्रीण आहे रुपाली कुलकर्णी आणि दुसरा माझा मित्र आहे.... समीर तांबे..
हो...
नाही हात लावत कशालाही..
पण तुम्ही लवकर या..
घ्या लिहून पत्ता.. "
...