......स्मशानातली रात्र......
" चॅलेंज स्विकारलंय तर आज मी जाणारच .. "
सुदर्शन मनातल्या मनात बोलत होता.
परवा एका ग्रुपवर भयकथेच्या पोस्टवर भुतांची खिल्ली उडवल्यावर लेखकाने स्मशानात जाऊन अमावस्येची एक रात्र घालवायचे चॅलेंज दिले. सोबत प्रत्येक तासाने फोटो पाठवायचे चॅलेंज सुद्धा..
त्याने ते स्विकारलं आणि आज ती रात्र आली होती.
सुदर्शनला सकाळी त्या लेखकाचा डायरेक्ट फोनच आला..
" सो डेअर डेविल... रेडी का? चॅलेंज स्विकारलंय आपण, आता मागे हटू नका. माझा नंबर आलाय त्यावरच दर तासाने फोटो पाठवायचे आहेत तुम्हाला. आपलं हे चॅलेंज रात्री अकरा ते सकाळी पाच पर्यंत चालणार आहे.
मी जागाच आहे... तुम्ही फक्त झोपू नका... प्रत्येक तासाच्या पहिल्या पाच मिनीटांत तुमचा फोटो येईल अशी अपेक्षा करतो. ओके ना? " लेखक महाशय हसत होते. काहीसे विचित्र स्वर होता त्यांचा.
" हो नक्की सर.. चॅलेंज घेतलंय तर पुर्ण करणारच मी, बरोबर अकरा पाच ला पहीला फोटो तुमच्याकडे येईल. " सुदर्शन आत्मविश्वासपुर्वक बोलला.
" यंग बॉय... दॅट्स नॉट सो सिंपल.. टेक केअर.. बाय.. " फोन कट झाला.
आलेला नंबर सेव्ह केल्यावर त्याने सहज डीपी चेक केला
डीपीला एक भयंकर चित्र होते स्टेटसला लिहिलं होतं
".. स्मशानातली रात्र..
कमिंग सून "
लेखकाने आपल्याला घाबरवायला हे सर्व मुद्दाम केलंय हे लक्षात न येण्याएवढा तो दुधखुळा नक्कीच नव्हता.
आज घरी कोणी नव्हते म्हणून कामावर दांडी मारुन दिवस झोपूनच काढला. सुदर्शनने रात्री बरोबर दहा वाजता गावाबाहेरच्या स्मशानाजवळ बाईक उभी केली.
गावाकडे यावेळेला याबाजूला कोणीच येत नाही हे त्यालाही माहीत होते.
पाठीवरची सॅक सांभाळत त्याने स्मशानात प्रवेश केला.
पहिलं पाऊल स्मशानात पडल्या पडल्या गावाकडच्या बाजूने एक कुत्रा जोराने विव्हळला. त्याच्या हृदयात क्षणभर का होईना पण चर्र झालंच...
हातातली टॉर्च त्याने स्मशानातल्या आतल्या भागात फिरवली.
अर्थात तिथे कोणी नव्हते..
रातकिड्यांच्या आवाजात तो अंधार अधिकच गडद होत होता..
फार वर्षांपुर्वी तो स्मशानात आला होता. बाबांना स्वतःच्या हाताने अग्नी देताना हमसून हमसून रडला होता. त्यानंतर आज...
गावात सर्व जातीधर्माचे लोक असल्याने स्मशानाचे तीन भाग पडले होते पहिल्या भागात ख्रिश्चन लोकांची थगडी, नंतर पुढे मुस्लिमांच्या कबरी आणि मग टोकाला हिंदूंसाठी चिता रचायचे दोन प्लॅटफॉर्म.. तिन्ही भाग एकाच दृष्टिक्षेपात दिसतं होते.
बॅटरीच्या उजेडात पिंपळाखालचा पार त्याला स्पष्ट दिसला..
रात्र घालवायला हा पारच मदत करेल हे सुदर्शनने ताडले.
पाठीवरची सॅक त्याने पारावर ठेवली मात्र...
पिंपळावरुन कोणीतरी फडफडत गेले... त्याचा आवाज लांब लांब जात गायब झाला.
बहुतेक घुबड किंवा वटवाघुळ असणार. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करुन त्याने पारावर चढून पिंपळाला टेकून बसकण मांडली.
घड्याळात अकरा वाजल्या बरोबर त्याने खिशातून फोन काढला..
लेखक महाशयांना सेल्फी काढून पाठवला.. आणि त्यांच्या रिप्लायची वाट बघू लागला..
दोन मिनीटांतच त्यांचा रिप्लाय आला.
" वेल डन मिस्टर डेअर डेविल. यु आर रिअली अ ब्रेव्ह मॅन.. बट हॅव यू नोटिस? देअर इज समथिंग स्ट्रेंज इन युवर सेल्फी.. फोटोत त्या मागच्या झाडाखाली पहा. "
खरंच फोटोत त्या झाडाखाली एक आकृती दिसत होती.. त्याने अलगद मान फिरवून त्या झाडाकडे पाहीलं...
तिथे कोणी नव्हते.
सुदर्शन मोबाईल मध्ये टाईप करु लागला.
" तिथे कोणीही नाही. अंधारामुळे आकृती दिसतेय. तुमच्या पोस्टवर सुद्धा हेच म्हटलेलं मी..
भुत म्हणजे कमकुवत मनाने केलेले मनाचे खेळ.. "
" ओके.. यू कॅरी ऑन... सी यु ऍट ट्वेल ओ क्लॉक.. " लेखक महाशय ऑफलाईन झाले.
पाच मिनीटेच झाली असतील.. अचानक वारा वाहू लागला.. हळू हळू वाढत तो जोरात वाहू लागला..
वाऱ्याने तिथला पाला पाचोळा उडून सुदर्शनच्या अंगावर येऊ लागला. अचानक आलेले हे वादळ विश्वास ठेवण्यापलिकडचे होते..
डोळ्यात धुळ जाऊ नये म्हणून वारा वाहत होता त्याच्या विरुद्ध दिशेला पिंपळाच्या खोडाजवळ जागा बदलून तो बसला..
अचानक कोणी तरी कानात पुटपुटल्यासारखं त्याला जाणवलं..
" अहं.. हा आवाज वाऱ्याचाच होता.. भास असेच होतात.. " त्याने मनाला धीर दिला.
पण आता तो आवाज स्पष्ट आला...
" कशाला मरायला आला आहेस इथे? " आवाज ओळखीचा वाटत होता... सुदर्शनने खुप आठवले....
मग एकदम आठवलं..
बाबा...
" पण हे कसं शक्य आहे... ?
त्यांना जाऊन तर पंधरा वर्षे झालीत.. "
तोच पुन्हा आवाज आला...
" तू आत्ताच्या आत्ता इथून जा... एकदा पलिकडचे उठले.. की मग तू इथेच अडकून राहशील.. मला जास्त वेळ तुझ्याशी संपर्क नाही करता येणार.. " त्याच्या कानात तो आवाज स्पष्ट येत होता.
" बाबा.. तुम्ही आहात हे? कुठे आहात.. ? तुम्ही तर पंधरा वर्षांपुर्वीच.. मग आता मला तुमचा आवाज कुठून येतोय.. आणि पलिकडचे म्हणजे कोण? तुम्ही आधी समोर या... " तो संभ्रमीत अवस्थेत बोलत होता.
" तू.... जा.... इ थू न.... " आवाज लांब लांब होत बंद झाला.. त्याबरोबर ते वादळही..
हा नक्की भासच....
सुदर्शन मनाशी बोलला.. तो पुन्हा त्याच्या पहिल्या जागेवर गेला..
मघाच्या घाईगडबडीत हातातली बॅटरी आणि पाठीवरची सॅक तो तिथेच ठेवून आला होता...
लालसर प्रकाशात त्याने त्या जागेकडे पाहीलं..
तिथे सॅक आणि बॅटरी नव्हती.. वादळामुळे पाराखाली पडल्या असाव्यात म्हणून त्याने पाराभोवती चक्कर मारुन पाहीली. तिथे पाल्यापाचोळ्याखेरीज काही नव्हते...
अचानक...
त्याच्या लक्षात आलं..
लालसर प्रकाश???
हा कुठून आला?
समोर जे त्याने पाहीलं ते बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली...
अर्धवट जळालेली चिता पुन्हा भडभडून पेटू लागली होती...
" सुदर्शन.. घाबरु नकोस... वादळामुळे पुन्हा पेटलीय ती... उलट विचार कर.. अमावस्येच्या अंधारापेक्षा आता चितेचा का होईना तुला प्रकाश मिळतोय.. "
त्या प्रकाशातच त्याने सॅक आणि बॅटरीचा शोध सुरु केला. पण दोन्ही वस्तू तिथे नव्हत्याच जणू अशा गायब झाल्या होत्या..
त्याने तो नाद सोडून दिला..
पारावर जाऊन बसला..
घड्याळात पाहीले तर बाराला दोन मिनीटे कमी होती..
त्याने खिशातून फोन काढला आणि चिता दिसेल असा सेल्फी फोटो काढून लेखक महाशयांना पाठवून दिला.
ते ऑनलाईन येईपर्यंत बसल्या बसल्या दर तासांनी वाजणारा अलार्म सेट केला.
पाच मिनीटांनी ते ऑनलाईन आले
" दॅट्स ग्रेट गोईंग..
चिता कशी पेटली पुन्हा? काही वेगळा अनुभव आलाय का... मिस्टर डेअर डेविल? " त्यांचा मॅसेज झळकला..
" नाही फार म्हणावा असा काही नाही थोडा वारा सुटला होता त्याने चिता पेटली... बाकी काहीच नाही.. " त्याने झालेल्या गोष्टी लपवल्या..
" गुड.. आय थिंक यू आर लकी... पण खरी जाग आता सुरु होईल बारा नंतर.. बेस्ट लक.. एक वाजता.. फोटोची वाट बघतोय.. " ते ऑफलाईन गेले.
फोन खिशात ठेवून त्याने चितेतल्या अग्नीत लक्ष दिले. कितीतरी वेळ तो त्या ज्वाळांकडे पाहत बसला होता. त्या ज्वाळा वेगवेगळे आकार तयार करत होत्या. सुरुवातीला काही प्राणी दिसले, एखादा माणूस दिसायचा.. मग मध्येच काहीतरी वेगळेच दिसायचं..
अचानक एक चेहरा दिसला..
ओळखीचा..
बाबा...??
त्यांचाच चेहरा.. कोणाशी तरी झगडत होता तो चेहरा.. कोणीतरी त्या चेहऱ्याला ओढत होते... जणू तो चेहरा आपल्याला काहीतरी सांगतोय आणि कोणीतरी त्याला अडवतंय..
" सुदर्शन काय झालंय तुला? हे सर्व भास आहेत. चेहरा दिसणे हे सुद्धा तुझ्या मनाचे खेळ आहेत... सारासार विचार कर.. " स्वतःच्या मनाला धीर देत त्याने नजर हटवली..
नजर एका जागीच खिळून राहीली.. एका थडग्याजवळ जमीन हलत होती..
अंधूक प्रकाशातही हालचाल स्पष्ट दिसत होती.
एक सडलेला हात.. मातीतून बाहेर येत होता..
भितीची एक जाणीव त्याचे रक्त गोठवून गेली.
आजवरच्या त्याच्या सर्व विचारांना छेद देणारा हा प्रकार होता. तो लगेच पारावरुन उठला आणि खोडामागे जाऊन त्या अघटीताकडे पाहू लागला..
अचानक थंड वाऱ्याची लहर आली.. खुप थंड..
तो सुकलेला, जागोजागी फाटलेला, फाटलेल्या जागेतून सडकं मांस लोंबकळत असलेला देह आता थडग्यातून पुर्ण बाहेर आला होता. .
सुदर्शन डोळे विस्फारुन त्याच्याकडे बघतच राहीला. हे असं काही दिसेल याची त्याला अजिबात कल्पनाच नव्हती. कपड्यांची लक्तरे व्हावीत तशी शरीराची लक्तरे झालेला तो हिडीस देह आता पाराच्या दिशेने सरकू लागला होता..
चितेच्या लालसर प्रकाशात ते कलेवर अजूनच भयानक दिसत होतं
सुदर्शनचे लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेले...
डोळे कसले... नुसत्याच खोबणी..
उजवा डोळा गालावर लोंबकळत होता आणि डावा डोळा नव्हताच.
प्रसंगावधान राखून सुदर्शन लगेच पिंपळाच्या झाडावर चढला.
वरुन दिसणारे दृश्य तर त्याहून भयानक होते. प्रत्येक थडग्यातून एक एक देह बाहेर येत होता. स्त्री - पुरुष, तरुण - वृद्ध सर्व प्रकारचे देह पाराकडे येत होते.
आजपर्यंत सिनेमात पाहीलेले दृश्य प्रत्यक्षात पाहील्यावर त्याच्या अंगाला घाम फुटला.
इतक्यात खिशातला फोन वायब्रेट होऊ लागला.
एक वाजल्यामुळे फोनने रिमांईंडर दिले होते.
फोन काढून अजिबात आवाज न करता त्याने पाराकडे येणाऱ्या विचित्र देहांचा फोटो काढला आणि लेखकाला पाठवला.. नंतर लगेचच सेल्फी काढूनही तो सेंड केला..
उत्तराची वाट न बघता तो खालचे दृश्य बघू लागला.
सगळे एव्हाना पाराखाली जमले होते.
त्याच्या अस्तित्वाची जाणीव बहुतेक त्यांना झाली होती.
पुन्हा एकदा अत्यंत थंड वारा सुटला..
फांदिवर बसलेल्या सुदर्शनला त्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली.
थंडगार स्पर्श... होता त्या हाताचा...
त्याने चेहरा वळवला मात्र.. त्या नखं वाढलेल्या पंजाची थंडगार पकड त्याच्या मानेभोवती बसली..
" ही... ही... ही... ही... " असं छद्मी हास्य आसमंतात घुमलं.
एका क्षणात ती त्याची मानेवरची पकड न सोडता त्याच्या समोर येऊन ठाकली .. बघूनच उलटी येईल असे तिचे रुप होते.. मळक्या काळ्या रंगाच्या कपड्यात हडकुळी देहयष्टी असलेली, भले मोठ्ठं नाक.. लाल डोळे, चेहऱ्यावर ओघळणारे मांस, आणि अत्यंत तीव्र दुर्गंध..
चेटकीण, जखीण की मग अजून कोण? या विचारात असताना.. पुढच्या क्षणाला त्याला तिने पिंपळावरुन खाली फेकलं.
" माझ्या जागेत यायचं नाही... ही ही ही ही ही ही
चल जा इथून..
दुखणारे अंग सावरत तो उठून बसला तेव्हा त्याला समजलं की चारही बाजूला ते समंध आहेत.
तो उठून उभा राहीला..
सगळीकडे भयंकर दुर्गंधी सुटली होती.
पाराला संपुर्णपणे त्यांनी घेरलं होतं. ते साधारण साठ सत्तर तरी होते. सगळ्यांचे हात त्याला स्पर्श करायला पुढे येत होते.
पुन्हा झाडावर चढलो तरी वरुन ती पुन्हा धक्का मारणार.
एकच मार्ग यांच्यातुनच मार्ग काढायचा..
एका जागी त्यांची साखळी सुटल्यासारखी होती.
" हाच तो क्षण..
सुदर्शन.. याक्षणी इथून निघाला नाहीस तर तुझा मृत्यु निश्चितच. जोराने पळ "
मनाशी ठिय्या करुन तो उसळला.
त्याच्या त्या हालचालीची कल्पना नसलेली ती घाणेरडी शरीर एकदम थबकली. त्यांच्या कड्यातून बाहेर निघताना त्यांचा स्पर्श झालाच त्याला.
थंडगार, लिबलिबीत शरीर, दुर्गंधीचे भपकारे येणारे..
सुदर्शन थेट चितेकडे पळाला..
त्या उजेडाचा अचानक त्याला सहारा वाटू लागला.
चितेच्या जितका जवळ जाता येईल तितके तो गेला आणि मागे वळून पाहीलं. ते देह त्याच्या दिशेनेच येत होते. पण एका परीघाच्या पुढे त्यांना येता येत नव्हते
जणू त्यांना कोणीतरी जखडून ठेवले होते.
खिशातला मोबाईल वाजला म्हणून त्याने त्यापरिस्थितीतही फोन बाहेर काढला.
लेखकाचे मॅसेज होते.
" काय झालं? फोटो कसला पाठवलाय दुसरा? नुसताच काळोख दिसतोय? "
" हॅलो यंग मॅन आर यू ओके? इज एनिथींग राँग? "
त्याने लगेच टाईप केलं " नथींग.. " त्याला तिथे घडणाऱ्या गोष्टी लेखकाला कळून द्यायच्या नव्हत्या.
फोन खिशात ठेवून. तो बाहेर निघण्याचा रस्ता शोधू लागला.
मागची भिंत खुपच उंच होती. एकच रस्ता होता जो त्या हिडीस देहांच्या मधून जात होता. आता त्यांची संख्या वाढली होती.
संपुर्ण स्मशान जागृत झालं होतं. सगळी थडगी आणि सगळ्या कबरी उघडल्या गेल्या होत्या.
सुदर्शनला त्याच्या डोक्यावरुन काहीतरी गेल्याचे जाणवले.... पांढुरकं... आजू बाजूला नजर फिरल्यावर त्याला ते स्पष्ट दिसू लागले.
पांढरे मनुष्याकृती असलेल्या आकृत्या होत्या त्या. ...
अतृप्त आत्म्यांनी त्याला वेढले होते.
आता एक एक त्याच्या भोवती फिरु लागले होते.
" सुदर्शन.. तुझा अंत आता नक्की. इकडे आड तर तिकडे विहिर.. कुठे जाणार तू? " सुदर्शन स्वतःशीच बडबडत होता.
इतक्यात एका आत्म्याने त्याच्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न केला. दोन फुट तो उंच उचलला गेला.. त्या आत्म्याला यश आलं नाही.. म्हणून दुसरा आला.
प्रत्येक प्रयत्नासोबत तो परीघाकडे सरकत होता.
जणू काही हे आत्मे त्याला त्यांच्याकडे सोपवत होते.
काही वेळातच तो पुन्हा त्यांच्या हातात जाणार होता.
देव...
आपण इतकी वर्ष भुत ही संकल्पना खोटी मानली, पण ती समोरच दिसतेय..
म्हणजे देव ही संकल्पना सुद्धा असणार...
अचानक त्याच्या तोंडी आलं
" भीमरुपी महारुद्रा.. वज्र हनुमान मारुती.. "
लहानपणी बाबा त्याच्याकडून म्हणून घेत होते.
आत्मे अचानक लांब पळू लागले.
पण परिघाबाहेरचे मात्र तिथेच होते. त्यांचे हात त्याच्या दिशेने झेपावत होते.
अर्धा पाऊण तास तो तिथे झगडत राहीला. शेवटी त्याची बोलण्याची ताकद संपली.
खिशातल्या मोबाईलचे वायब्रेशन जाणवलं.... तीन वाजले होते. त्याने चितेच्या दिशेने फोटो काढला आणि लेखकाला पाठवून दिला.
हे करत असताना तो एक गोष्ट विसरला.....
तो स्त्रोत्र बोलायचा थांबला होता....
पुढच्या क्षणी तो हवेत एका धक्क्याने उडवला गेला. परीघापलीकडे जाताना त्याला समजलं की त्याचा अंत आता जवळ आलाय.
स्मशान आपली भुक भागवत होतं... सुदर्शनच्या किंकाळ्या ऐकणारे जवळपास कोणीही नव्हते.
लेखकाने चार वाजून दहा मिनीटांनी आपला लॅपटॉप सुरु केला आणि हसत हसत टाईप केलं...
".....स्मशानातली रात्र.....

सुदर्शन मनातल्या मनात बोलत होता. "

No comments:
Post a Comment