.... अपघात ....
कपड्यांची बॅग गाडीच्या डिकीत ठेवत कैवल्यने केतकी ला विचारलं...
" सर्व वस्तू घेतल्यास ना? "
त्याच्याकडे लटक्या रागाने बघत...
" पॅकिंग मी एकटीनेच नाही केलंय.. तुम्हीही होतात सोबत समजलं ना? काही राहीलं असेल तर माझ्या इतकंच तुम्हीही जबाबदार ".
गालातल्या गालात हसत कैवल्यने डिकी बंद केली.
लग्न, पुजा, पाहुणेपण सर्व आवरल्यानंतर हे नवपरीणीत जोडपं वैवाहिक जीवनाची सुरुवात करायला गोव्याला निघाले होते.
गाडी सोसायटीच्या बाहेर निघाली. केतकीने प्लेयरवर गाणी सुरु केली. रोमँटिक गाणी तिने अगोदरच सिलेक्ट करुन आणली होती.
प्रत्येक गाण्यावर ती मोहरत होती. डोळ्याच्या कोनातून कैवल्यकडे पाहत ती मनातल्या मनात स्वतःला नशीबवान समजत होती. जेवढी ती सुंदर होती तेवढाच तोही हँडसम होता.
कैवल्यचे लक्ष पुर्णपणे गाडी चालवण्यावर होतं. गाडीने एव्हाना पनवेल सोडले होते. रस्ताला ट्रॅफिक नको म्हणून ते दोघे लवकरच निघाले होते.
पिवळा प्रकाश फेकत गाडी सुस्साट वेगाने गोव्याच्या हायवेला लागली होती.
प्लेयर वर गाणं सुरु झालं..
" रात का नशा अभी...
आंख से गया नही "
मंद मंद हसत कैवल्यने केतकीकडे पाहीलं.
तिच्या गालावर लज्जेचा रक्तीमा पसरला. एक दिवसापुर्वीचे ते क्षण दोघांच्याही मनात रुंजी घालू लागले. उत्कट आवेगाने केतकीने मारलेल्या मिठीची आठवण कैवल्यला झाली. केतकी सुद्धा तिच्या ओठांवर झालेला कैवल्यच्या ओठांचा पहीला स्पर्श आठवून धुंद झाली होती.
कैवल्यने गाडीचा स्पीड कमी केला.
गाडीचा स्पीड कमी झालेला पाहून केतकी खुदकन हसली.
" काय झालं हसायला? कैवल्यने खट्याळ नजरेने तिच्याकडे बघत विचारले..
" कुठे काय? मला आलं हसायला काहीतरी आठवून..
पण गाडीचा स्पीड का कमी झाला? "
हसत हसत तिने गाण्याचा आवाज कमी केला.
" यु नॉटी... करु मी?? "
त्याच्या डोळ्यातला खोडकरपणा तिला दिसला.
" नो वे... गाडी चालू आहे.. अजिबात नाही.. जे काही करायचंय ते गाडी थांबवून करा ... आय... आय.. आय मिन तिकडे गेल्यावर करु.. " तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून त्याने तिला स्वतःकडे ओढलं.
गाडी हळू हळू पुढे चालली होती. रस्त्याला कोणीही नव्हते.
अचानक केतकीची नजर त्याच्या चेहऱ्यामागे गेली....
एक लाल- पिवळ्या रंगाची साडी घातलेली स्त्री रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाडी थांबवण्यासाठी हातवारे करत होती.
" कैवल्य... ब्रेक.. ती बाई बघा .. कैवल्य sss.. " ती जोराने ओरडली.
" ओ शीट.. " कैवल्यने करकचून ब्रेक दाबला.. स्पीड नसला तरी झटका बसायचा तो बसलाच होता.
दोघांनीही आपले डोळे बंद केले होते.
" कैवल्य.. अपघात झाला?
ती बाई कुठे दिसत नाहीए. " केतकीच्या चेहरा घामाने डबडबला होता.
" वेट मी बघतो.. आपला स्पीड कमी होता. फार फार धक्का लागला असेल तिला. " कैवल्य खात्रीपुर्वक बोलत होता.
इतक्यात कैवल्यच्या बाजूच्या काचेवर टकटक झाली...
तीच बाई होती...
ती गयावया करत होती
काच खाली केल्यावर तिचा आवाज यायला लागला..
" प्लिज भाऊ... मला मदत करा.. आमच्या गाडीचा अपघात झालाय. माझी लहान मुलगी आतमध्ये अडकलीय. सर्व काचा बंद आहेत. तुमचे खुप उपकार होतील. " तीने हात जोडले होते.
" बापरे.. आलो आलो.. चल केतकी.. लवकर चल. " गाडी बंद करत त्याने सिटबेल्ट काढला आणि तीने दाखवलेल्या दिशेकडे धावत सुटला.
मागून केतकी आणि ती बाई धावत येत होती.
झाडाला धडकलेली लाल गाडी रस्त्यावरुन दिसत नव्हती. बहुधा कंट्रोल सुटल्याने ती रस्ता सोडून इकडे खाली आली आणि त्याच वेगात झाडाला धडकली होती. गाडीच्या पुढच्या भागातून धूर येत होता.
झाड होतं म्हणून ती गाडी थांबली होती. अन्यथा पुढे असलेल्या साठ सत्तर फुट खोल दरीत पडली असती. कैवल्यने दरवाजाला हात घातला मात्र..
गाडी एक इंच पुढे सरकली..
कैवल्य जागचा थबकला..
" मागच्या सीट वर आहे पहा.. " त्या बाईंनी ओरडून सांगितले.
" हो.. हो.. तुम्ही काळजी करु नका. काढेल तो तिला..
कैवल्य सांभाळून जरा. " बाईंना धीर देताना कैवल्यची काळजी केतकीच्या आवाजात स्पष्ट दिसत होती.
मागच्या डोअरच्या काचेवर बाष्प साचलं होतं. कैवल्यने वरुन अलगद हात फिरवला..
आत अडीच तीन वर्षाची मुलगी रडताना दिसली.
" थँक गॉड... केतू... जा लवकर गाडीतला हॅमर आण तुझ्या सीट खाली आहे पहा. गाडी सेंटर लॉक दिसतेय. काच फोडण्याशिवाय पर्याय नाही. जा लवकर.. क्विक "
हे शब्द ऐकताच केतकी धावतच गाडीकडे गेली. सीटखाली हॅमर होता तो घेऊन काही सेकंदातच कैवल्यकडे आणून दिला.
" मागे हो... होप तिला लागणार नाही काचा.... हळूहळू तोडतो. देवा काही गडबड नको होऊ दे "
एक लक्ष गाडीच्या चाकावर ठेवून...
केतकीला मागे सरकवून त्याने काचेवर घाव घातला..
काच फुटल्याच्या आवाजासोबत त्या लहान मुलीच्या रडण्याचाही आवाज येऊ लागला...
" मम्मा.... मम्मा... मम्मा.. " ती धाय मोकलून रडत होती. लॉक उघडल्याबरोबर त्याने दरवाजा उघडून तिला बाहेर काढलं..
ती गाडीकडे बोट दाखवून रडत होती...
त्याच्याने आवरेना म्हणून तिला केतकीकडे सोपवलं.
"अरे.... ती बाई कुठाय? " विस्फारलेल्या डोळ्याने कैवल्य पाहत होता.
केतकीने बाजूला वळून पाहीलं..
ती तिथे नव्हती...
" मम्मा... मम्मा... मम्मा.. ती मुलगी गाडीकडे बोट दाखवून रडत होती..
कैवल्य धाडस करुन पुढच्या दरवाजाजवळ गेला. काचेवरचे बाष्प पुसले आणि आतले दृश्य बघून सर्द झाला.
इतक्यात...
कडकड आवाज झाला..
केतकीने लगेच कैवल्यला मागे खेचले..
गाडी सरसरत पुढे गेली आणि मोठा आवाज करत थेट दरीत कोसळली..
मुलगी अजूनच जोराने रडू लागली..
" मम्मा... मम्मा.. मम्मा.. "
" कैवल्य... आपण वाचवलं हिला... अहो पण हिची आई कुठे गेली? कैवल्य... कैवल्य "
शुन्यात नजर लावून उभ्या कैवल्यला स्पर्श करताच तो भानावर आला...
खिन्न स्वरात कैवल्य बोलला....
" केतू.. आपण नाही वाचवलं हिला... तिच्या आईनेच वाचवले.. गाडीत ड्राईव्हिंग सीटवर हीची आई होती.. "

No comments:
Post a Comment