.... प्लॅटोनीक ....
तिने मोबाईलच्या ड्रापडाऊन सेटींग मधून वायफाय ऑन केला आणि पटकन फेसबुकवर जाऊन चॅट ओपन केला.
हात अजूनही ओले होते तिचे.
जेवण करुन उठली आणि मॅक्सीला हात पुसुनच तिने मोबाईल हातात घेतला होता.
तो अॅक्टीव दिसत होता..
नोटिफिकेशन वर दहाचा आकडा दिसत होता. चेक केले तर सर्व नोटिफिकेशनला त्याचीच अॅक्टीवीटी होती.
तिने
" हाय, मी आले... 😀" असं सेंड केलं.
पंधरा सेकंदाने सीन असं आलं..
" लवकर लवकर जेवलीस की काय? दहा मिनीटे पण झाली नसतील जावून तूला "
समोरुन रिप्लाय आला.
" आले की जेवून... कसं जेवले ते माझं मला माहीत.. सोड ना ते. पुढे सांग ना, काय झालं? "
ती जरा सावरुन बसली.
" एक मिनीट... मला सांग तूझं नेमकं काय चाललंय?
मी बघतोय गेले काही दिवस. तुझ्या मॅसेजची संख्या आणि तुझे ऑनलाईन राहाणे वाढत चाललंय. पुर्वी नसायचीस एवढी ऍक्टीव तू? "
" हो... मग? त्यात काय झालं? तू सुद्धा असतोस की भरपूर वेळ ऑनलाईन, माझ्याबरोबर गप्पा मारत. "
बराच वेळ मॅसेज सीन येईना. म्हणून तिने वायफाय राऊटर च्या लाईट्स कडे लक्ष दिलं.. चारही लाईट्स व्यवस्थित चालू होत्या...
इतक्यात टायपिंग सुरु झालं.
" 😂😂
काय गं तू? "
त्याने हसण्यावारी नेलं याचा तिला राग आलेला पण तिने ठरवलेले की आज सांगायचंच त्याला.
" ऐ... एक सांगू तूला?
मला ना कधी कधी कमाल वाटते तूझी. म्हणजे एखादा माणूस अगदी आपल्यासारखाच कसा असू शकतो?
एकाच्या मनात असलेली हुरहुर दुसर्याच्या मनात तशीच कशी असू शकते?
जेव्हा वाटत की तुझा मॅसेज आता यावा तेव्हा नेमका तू मॅसेज पाठवतोस?
कधी एकटी बसलेली असते, आणि वाटतं की तू फोन केलास तर छान गप्पा माराव्या, नेमका पुढच्या मिनीटाला तुझा फोन येतो...
रस्त्याने जात असताना तुझा विचार मनात यायला आणि तू समोर दिसायला परवा एकच झालं.. आठवतंय ना? "
तीने सेंड केलेलं पटकन सीन झालं...
" प्रेमात पडलीस माझ्या? "
" अगदी तसंच नाही रे पण ते प्लॅटोनीक लव्ह म्हणतात तसंच काहीसं झालंय. शरीराबद्दल ओढ नाही किंवा तशी कुठली वासना ही नाही.. फक्त तुला भेटण्याची आणि पाहण्याची ओढ, तासन् तास तुझ्या सोबत बोलण्याची ओढ.. एक आसुसलेपणा आहे रे. "
" अगं ए... वेडी झालीस का?
इतकं इमोशनल नाही व्हायचं या ऑनलाइन जगात?
तू ना खरंच माझ्या प्रेमात पडलीस. मी कुठल्या बंधनात राहणारा नाही. तु जेवायला गेलेलीस तेव्हा मी दुसर्या मैत्रिणीसोबतच बोलत होतो की. मी एक हवा का झोंका आहे.. आज इथे तर उद्या तिथे. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माहीत आहे मी कसा आहे तो. माझ्या प्रेमात कोणी पडत नाही, प्रत्येकाला मी हवा असतो.. मित्र म्हणून. प्रत्येकाला माझ्या सोबत बोलायचं असतं, माझा सहवास हवा असतो. पण प्रेम..??
ते माझ्यासाठी नाहीच गं.
मी आहे ना एक झाड आहे... उजाड माळरानावरचं. लोक उन्हात तापले की सावलीला, गार वारा खायला माझ्या जवळ येतात. त्यांना आराम वाटला की ते आपल्या पुढच्या मार्गाला जातात. देवाने मला अभिशापच दिलाय...
स्थितप्रज्ञतेचा...
कुणी प्रेमात पडलं तरी आपण निर्विकार राहायचं...
कितीही भावना दाटून आल्या तरी भावनाशुन्य रहायचे..
जगात खुप प्रेम आहे की ते बघत बघत आपण खुश होतो की.. अजून काय पाहीजे. "
" असा कसा रे तू? तुला काहीच कसं कळत नाही? "
तिचा मॅसेज सीन झाला...
" काही गोष्टी आहेत ना त्या ना कळलेल्याच बऱ्या.. मी या पृथ्वीवर एक अभिशाप घेऊन आलोय. तो भोगणे हे माझे कर्तव्य आहे. मला नाही माहीत की तू मागचा जन्म मानतेस की नाही... पण मी ना हे मागच्या जन्मीचे भोग भोगतोय. या भोगात प्रेमाला जागाच नाही गं अजिबात.
तुला मदत पाहीजे मानसिक, वैचारिक कधीही द्यायला मी तयार आहे.
पण प्रेम.... नाही जमणार मला. मघाशी वर काहीतरी प्लॅटोनीक वगैरे म्हणालीस... पण तसं नसतं काही.
प्रेम हे फक्त शारीरिक होण्यापुर्वीची मानसिक तयारी असते. म्हणजे माझं तरी तेच मत आहे.
आणि जर मला शारिरीक व्हायचे नाही तर मानसिक होण्यात काय शहाणपणा आहे ना?
समजतंय ना मी काय बोलतोय ते? "
ती हे सर्व वाचून सुन्न झाली होती...
डोळ्यातून धारा वाहत होत्या.
" मला नाही काही समजत हे...
मला तू हवा आहेस... माझे प्रेम म्हणून. "
मॅसेज सीन यायची वाट बघत राहीली ती....
अजूनही बघतेय....
रोज....
कारण त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही... बोलला नाही... भेटला नाही..

अप्रतिम
ReplyDelete