.... एक दिवस ....
रात्रीच्या धसमुसळ्या शृंगारानंतर कधी झोप आली ते कळलेच नाही. वरच्या झाडावरुन दवाचा थेंब पापणीवर पडला आणि एकदम जाग आली. शिवूचा हात अजूनही तसाच पोलक्यामध्ये घुसलेला होता. एवढ्या थंडीतही तो शर्ट न घालता झोपला होता. त्याला थंडीची काही चिंताच नव्हती म्हणा तो तिशीचा तरुण.. सळसळत्या रक्ताचा गावावरुन पळून आलेला. पण मग काहीच काम मिळाले नाही म्हणून पाकीटमार, चोरी, हातचलाखी वगैरे करुन या फुटपाथवरच येऊन झोपणारा.
नाही म्हटलं तरी मी चाळीशीची असेनच. नवरा मेला त्यानंतर कुटूंबाला मोहताज झालेली सर्वांनी टाकलेली... मी सुद्धा सहारा शोधत शोधत इथे आलेली. कधी जवळ आलो ते कळलं नाही.. पण त्याला माझे शरीर हवे होते आणि मला त्याचे. दोघेही एकाच कारणासाठी जवळ आलेलो.
लग्न, कुटूंब वगैरे सर्व छूट या विचारावर आम्ही पक्के होतो. आमच्या संभोगातून एक पोर सुद्धा जन्माला घातलं आम्ही...
अरे मीनू कुठे गेला?
मी शिवूचा हात अलगद पोलक्यातून बाहेर काढला. माझ्या अंगावर असलेला त्याचा डावा पाय सुद्धा अलगद खाली सरकवला. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मी जास्तच शहारली.. पण मीनू कुठे गेला हे शोधणे जास्त महत्वाचं होतं. मी उठून साडी ठिक केली काळ्या साडीवर ते सफेद डाग पटकन दिसत होते. फुटपाथच्या या टोकापासून त्या टोकावर पाहीले. मिनू दिसेना..
मग हाक मारली...
" मीनू... मीनू... कहाँ है रे तू.. मीनू... "
ओरडताना डोळ्यात एक कळ आली. काल पाकीट चोरताना त्या जाड्या बाईने पकडले आणि तिघी चौघींनी मिळून मारले त्यात एक ठोसा डोळ्यावर लागला होता. त्याची जखम आता टरटरून सुजली होती.
" शिवू... उठ शिवू... मीनू कही दिख नहीं रहा... उठ.. "
लाथेनेच शिवूला उठवू लागले. नजर मात्र फुटपाथच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत फिरत होती.
" क्या है सुबे सुबे?
होएंगा यही कही.. संडास को बैठा होगा देख गाडी के पिछे."
त्याला काळजी नव्हती असं नाही... पण तो तसाच होता.
भिती अशी नसायचीच त्याला. अजून एकदाही पकडला गेला नव्हता तो. त्यामुळे त्याला भयंकर आत्मविश्वास होता.
मागे एकदा रात्री संभोग करत असताना हवालदाराने दम दिला होता.. तेव्हा सुद्धा हा त्याला उलटून बोलला..
" साब तुमको करना है आव? हमारा यही घर है.. हम यही करेंगे ये सब कुछ. "
हवालदाराने क्षणभर माझ्या उघड्या शरीराकडे पाहीलं आणि....
शिव्या देत निघून गेला.
मी जास्तच ओरडायला लागली तसा तो उठला. अंगात उशाला असलेला शर्ट घातला. मानेपर्यंत रुळणारे केस झाडले आणि फुटपाथच्या बाहेरुन एक चक्कर मारुन आला. मध्येच " मीनू.. मीनू... " अशा हाका सुद्धा मारत होता..
" उसकी माँ का... कहाँ गया बे तू? सुबे सुबे क्या नाटक कर रहा है तू ? "
आमच्या आवाजाने फुटपाथवरची बाकीची माणसं पण उठली होती. ती सुद्धा काळजीने मीनूला शोधू लागली.
तो तिथे नाही हे समजताच मी मटकन खाली बसले...
डोळ्यात पुन्हा कळ गेली.
" अबे अब तू रो मत.. मिल जाएगा.. इधर उधर कही गया होएंगा. " त्याने बिडी पेटवत मला समजूत घालायचा प्रयत्न केला.
इतक्यात पार्कींगवाला आला..
" चलो हो गया तुम्हारा टाईम खतम.. फुटपाथ साफ करके जाने का.. हाँ? " त्याला झालेल्या गोष्टीची कल्पना नव्हती...
आणि असती तरी काय फरक पडला असता म्हणा?
त्याच्या दृष्टीने मी एक 'छिनाल' होती. मी झाडाला टांगलेला झाडू घेऊन पटापट फुटपाथ साफ केला.
मागच्यावर्षी एका शेठने फुटपाथवरच्या सर्वांना चादरी दिल्या होत्या त्या गुंडाळून पिशवीत भरल्या आणि ती पिशवी घेऊन फुटपाथ रिकामा केला. तो अलिखित नियमच होता. आता दिवसभर तिथे फेरीवाल्यांचे राज्य..
मी सगळीकडे पाहत होते...
कुठे मीनू दिसतोय का... फुटपाथ संपला तसा माझ्या संयमाचा बांध फुटला...
" मीनू.... मीनू... कहाँ है तू?" मी दुखणाऱ्या डोळ्यावरुन हात फिरवला...
" चुप अभी...मील जाएगा मीनू, काम कर पैले.. वो देख सामने से वो औरत आ रहीं हैं, उसका ध्यान मोबाईल पर है..पर्स मार उसकी... जा जल्दी.. "
शिवूला पोराची काळजी नव्हतीच की काय असं वाटू लागलं मला. त्याचंही काही चुकत नव्हत.. मीनू झाला म्हणून झाला... औषध खावूनही जगला म्हणून झाला. नाहीतर नकोच होता तो त्याला.
काळजावर दगड ठेवून पिशवी शिवूच्या हातात देऊन त्या बाईकडे गेले.
खरंच तिचं लक्ष नव्हते.. ती मोबाईलमध्ये पुर्ण घूसली होती.
ब्लाऊजच्या कप्प्यात लपवून ठेवलेले ब्लेड अलगद बाहेर काढले, आणि त्या बाईच्या बाजूला जाऊन अलगद पर्सला ब्लेड मारला. आतून पाकीट आणि एक लिपस्टिक पडली ती वरच्यावरच झेलली.
त्या बाईला कळलेही नाही की तिची पर्स मारली गेली.
पाकीट शिवूच्या हातात देऊन त्याला विचारलं ...
" शिवू.. चल ना पुलिस में जाते है. मीनू चाहीये मुझे. जाने कौनसी हालत में होगा? मेरा खून है वो.. चल ना.. "
शिवू चिडलाच एकदम..
" तुझे जाना है तो जा.. में नहीं जाऊंगा पुलिस के सामने. एकबार नजर में आ गया तो सब खतम.. "
आता मात्र मी चिडली... तशीच तणतणत पोलिस स्टेशनकडे निघाले.
पोलिस स्टेशनच्या गेटवरच्या हवालदाराने थांबवलंच.
" कहाँ जा रही है तू? क्या काम है? "
माझ्या अवताराकडे बघून नक्कीच मला आत सोडलं नसतं, पण त्याने माझ्या डोळ्यात पाहीलं..
आत जाऊ दिलं.
सायबाकडे गेले.. विचारलं काय झालं...
मी सांगितले की..
" साब मेरा लडका गुम गया.. रात को साथ में सोया था सुबह गायब हो गया. धुंडो ना जरा. "
सायबाने विचारलं..
" नाम क्या है , उमर कितनी है? "
मी पटदिशी नाव सांगितले.. वय सांगितले.
साहेबाने हवालदाराला बोलावून घेतले आणि सांगितलं...
" माने तो मुलगा या बाईचा दिसतोय. जा घेऊन बघू या बाईला. ओळख पटवा आणि सुपुर्द करा तिला. "
माझ्याकडे वळून म्हणाले.
" एक दो साल का लडका सुबह मिला है. लेकीन बेहोश है. शायद उसे अफू सुंघाई है.
तुम्हारे पास कोई प्रुफ है,? उसका फोटो वगैरा? "
मी घाबरुनच म्हटलं..
" नहीं साब.. हम फुटपाथ पर रहने वाले आदमी कहाँ से फोटू निकाले? "
" कोई प्रुफ नही? तो मुश्किल है "
मला त्याक्षणी खुप एकेकटं वाटू लागलं..
शिवू असूनही काही कामाचा नाही...
समोर मिनू आहे.. पण तो माझा आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावाच नव्हता. त्याचा जन्म सुद्धा फुटपाथवर झालेला. राणी मौसीने केलेलं सर्व. सायबाला दाखवायला पुरावा काहीच नव्हता.
मिनू थोडासा हलला. बहुतेक त्याला शुद्ध येत होती. मी ओरडले...
" मिनू... "
माझा आवाज ऐकून... तो आजूबाजूला पाहायला लागला. सायबाने फाईल मधून डोकं वर काढलं.
मिनू माझ्याकडे बघून रडू लागला. मी उभी राहीली तशी हात उंचावून माझ्याकडे झेपावला.
सायबाला खात्री पटली होती.
" देखो... तुम्हारा नाम और जहाँ रहते हो.. वहाँ का पत्ता सिपाही के पास लिखवाके जाओ. गवाही के लिए आना पडेगा. समझ गयी ना? जाव अभी.. "
मी मिनूला छातीशी धरलं. लक्ष समोरच्या घड्याळात गेलं चार वाजले होते....
दिवस संपायला आला होता. मी सायबाला नमस्कार करायला गेले तर...
फोन वाजला..
हवालदार माने बोलू लागले...
" बोला... पोलिस स्टेशन..
काय झालंय? ....
कुठे??
अच्छा.. नाव काय आहे?
अच्छा.. शिवेन्द्र. चर्चगेट समोरच्या फुटपाथवरचा पाकीटमार ना??
कुठे जखम आहे..?
मानेवर?
हां ठिक आहे.. तुम्ही पंचनामा करुन घ्या.. मी येतो सायबांना घेऊन. "
हे ऐकून मी स्तब्ध झाले..
माझा दिवस मावळला होता..
कायमचा...

No comments:
Post a Comment