.... मणी मंगळसूत्र ....
" ऐक सुमेध..
मी आज ऑफिसमधून जरा उशिराच येणार आहे. अरे त्या शिल्पाचा बर्थडे आहे आणि ती आम्हाला सर्वांना घेऊन खाऊगल्लीत नेणार आहे पार्टी द्यायला. जास्त नाही होणार.. फार फार तास दोन तास. "
आरशासमोर उभी राहून ती केस विंचरता विंचरता सुमेधला सांगत होती.
" बरं बाई.. करा तुमची खाऊगल्लीतली पार्टी. मी आणतो स्नेहा आणि स्वप्नीलला क्लास मधून. तसंही आज मला काही काम नाही घरी बसून टिव्ही बघण्याशिवाय. " सुमेध सोफ्यावर लोळत तिच्यासोबत बोलत होता.
इतक्यात तिचा फोन वाजला..
समोर शिल्पाच होती.
" नालायक... मी तूला म्हटलेलं लवकर ये म्हणून. तुझ्या सोसायटी बाहेर टॅक्सी घेऊन थांबलीय... फुकटचं मीटर वाढतंय.. ये की लवकर. " ती चिडली होती
" आले गं राणी.. ही काय जिन्यातच आहे. " फोन कट करुन तिने घाईघाईने केसांना रब्बर लावला आणि बॅग घेऊन नेहमीप्रमाणे...
" ए मी निघाले... बाय " म्हणून दरवाजा बंद केला.
जिन्यातून जाणारी तिची पावलं ऐकून सुमेध खिडकीजवळ आला. तो घरी असला की तो तिला बाय करायला खिडकीत येत असे.
तिने वर पाहीले आणि हसून हात हलवला..
आणि धावत पळत टॅक्सीत जाऊन बसली.
" काहीतरी मिसींग होतं....! काय बरं... काय विसरली बरं? " असा विचार करत करत त्याचे लक्ष ड्रेसींग टेबलावर गेलं.
तिचं नाजूक मंगळसूत्र तसंच टेबलावर राहीलेलं.
" हां.....म्हणूनच काहीतरी कमी वाटत होतं. "
त्याने लगेच मोबाईलवरुन कॉल केला.
" हो... कळलं....
विसरले आज... ही शिल्पा हसून हसून मरतेय.. आता तू नको सुरु होऊस.. " ती चिडूनच बोलली.
" बरं.. संध्याकाळी काय काय होतंय ते सांग मला.. अजून मजा येणार आहे.. " सुमेधला हसू आवरत नव्हते.
" गप्प बस तू..
तुझ्यामुळेच उशीर झाला मला.. ठेव तू फोन... " तीने फोन कटच केला..
बाजूला बसलेली शिल्पा हसून हसून डोळे पुसत होती.
" ऐक... अगं माझ्या पर्स मध्ये एक सेट असेल. तो घाल म्हणजे गळा सुना सुना वाटणार नाही. " शिल्पाने पटदिशी तो सेट काढून दिला.
पण तिच्या ड्रेसवर अजिबात मॅच होत नव्हता. त्यामुळे तो परत देऊन टाकला.
" काही नाही होत.. एक दिवस जरा चेंज.. बिना मंगळसुत्राची " तिने सुद्धा तोंडाला रुमाल लावला.
टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन दोघी ऑफीस च्या आत गेल्या.
वॉचमेन ने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहीलं..
त्याचे लक्ष तिच्या उघड्या गळ्याकडे गेले.
" काय मॅडमजी? आज साहेबांना घरी विसरुन आलात की काय? " त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं.
" हां रे.. ठेवलं एक दिवस घरी तर काय बिघडलं? नेहमी कशाला घेऊन फिरायचं? " तिने त्याला उडवूनच लावलं.
आज शिल्पाचा वाढदिवस त्यामुळे सर्व तिला शुभेच्छा देत होते आणि हिच्याकडे बघून हसत होते.
अकाउंट्सची दिपा जवळ आली आणि तिला विचारलं..
" काय गं..? सुमेधने तुला सोडलं की तू सुमेधला सोडलंस? "
" तू जास्त शहाणपणा नको करुन.. माहीत आहे त्याची कॉलेजफ्रेंड आहेस मोठी. अगं निघताना घाई झाली आणि विसरले आज पहिल्यांदाच.. त्यात काय एवढं? जा तू तुझ्या कामाला लाग. बॉस आले ना चांगली खरडपट्टी काढतील तुझी. "
हे बोलायला आणि बॉस यायची एकच वेळ झाली..
त्यांनी ऐकलं होतं...
" सो.... प्रिटी वुमन.. कोणाची खरडपट्टी काढायचीय? टेल मी.. आणि आज तू काहीतरी वेगळी दिसतेस.. ओ ओ ओ.. मंगळसुत्र कुठाय तुझे? ....
एनी प्रॉब्लेम? " डोळे तिच्या गळ्यात रेंगाळत बॉस बोलले.
" नो सर.. इट्स अॅब्सोल्युटली फाईन...
मी घरुन निघताना घाई घाईने निघाले त्यामुळे मंगळसुत्र टेबलवरच राहीले. " तिने समजवण्याचा प्रयत्न केला.
" ओके ओके... कम क्वीक टू माय केबिन. काही चेक्स आहेत ते बँकेत जाऊन डिपॉजीट करायचे आहेत. ते घेऊन जा आणि हो अकाउंटस् स्टेटमेंट सुद्धा घेऊन ये तिन्ही अकाउंटसचं " बॉस ची नजर सारखी फिरुन फिरुन गळ्यावरच जात होती.
" येस सर... आलेच मी. " हे बोलल्यावर संभाषण संपेल असं तिला वाटलेलं. पण बॉस काही टेबलासमोरुन जाईच ना.
" तु खरंच आज प्रिटी वुमन दिसतेस.. नॉट अॅकिचुअली वुमन.. यू लुक गर्ल.. " बॉस जरा जास्तच लाडात आले होते.
" थँक्स् सर... मी येते केबीनमध्ये, आणि सर आज शिल्पाचा वाढदिवस आहे... "
विषय बदलावा म्हणून तिने वाढदिवसाचा विषय काढला.
वाढदिवसाचे कळल्यावर बॉस ला शिल्पाकडे जाऊन तिला विश करणे आलंच.
दहा बारा चेक घेऊन ती ऑफिस बाहेर निघाली.
आज बँकेत तुरळक लोकं होती.
चेक डिपॉजीट केले आणि संध्याकाळी शिल्पाला काहीतरी गिफ्ट घ्यायला हवे म्हणून दोन हजार रुपये स्वतःच्या अकाउंटमधून काढण्याची रिसीट भरली.
" मॅडम.. आज काहीतरी वेगळ्या दिसताय. काही बिघडलंय का? " कॅशियरने गळ्याकडे बघत हसत हसत विचारलं.
" नाही.. तर काही नाही. अहो घाईगडबडीत मंगळसुत्र घालायला विसरली. " तीने हसून प्रत्युत्तर दिलं.
" पण खरंच आता तुम्ही विवाहीत अजिबात वाटत नाही... जस्ट लाईक संतूर गर्ल... " त्याने चेहराभर हसू आणून दोन हजाराची नोट तिच्या समोर ठेवली.
" थँक्स् अ लॉट... म्हणजे पैशांसाठी ही आणि संतूर गर्ल साठीही.. " ती सुद्धा मनातून खुश झाली होती.
चेक भरलेल्या रिसीट आणि स्टेटमेंट व्यवस्थीत बॅगेत भरल्या आणि स्वारी पुन्हा ऑफिसकडे निघाली.
तोंडात आपसुकच गाणं येत होतं..
" आज फिर जीने की तमन्ना है.... आज फिर मरने का इरादा है... "
नेमके रस्त्यात तिला जुन्या घराशेजारी राहणारे शिंदे आजी - आजोबा भेटले.
आजीचे डोळे विस्फारलेले....
" काय गं कधी झालं हे??
कळवायचं तरी. कशामुळे?
हार्ट अटॅक का?
सारखं जेवण ही बाहेरच असायचं त्याचं. "
आजोबांनीच त्यांना थांबवलं..
" अहो आजी नाही.. गैरसमज करुन घेऊ नका.. मी फक्त मंगळसुत्र घालायला विसरलीय घाई गडबडीत. सुमेध एकदम ठिक आहे.. " तिने हसून सांगितलं.
" चला ओ. काय बाई आजकालच्या पोरी..
आमच्या काळात घरुन मंगळसुत्र आणि टिकली शिवाय घराबाहेर पडूच दिलं जायचं नाही... या बघा.. खुशाल बाहेर फिरताहेत. " डोक्याला हात लावून शिंदे जोडपं निघून गेलं.
ती हसत हसत ऑफिसला पोहचली. वॉचमेन ने पुन्हा सकाळचीच खोडकर स्माईल दिली.
टेबलासमोर दोन क्लायंट बसले होते.
दोघेही तिशीचे होते.
तिला बघून जरा जास्तच खुश झाले. त्यांना ती अगदी अव्हेलेबल वाटत होती. नमस्कार चमत्कार झाल्यावर. कामासंबधी बोलणं झालं. तिला फार परिश्रम घ्यावे लागले नाही. दोघांनीही लगेच चेक सही करुन दिले. रिसीट बनवून देताना दोघेही तिच्याकडे विचित्रपणे पाहत होते. कालपर्यंत मंगळसुत्रामुळे तिला जी सुरक्षा होती ती अचानक गेल्यासारखी वाटू लागली.
काम करता करता दिवस संपला..
सर्व निघून तयार झाले खाऊ गल्लीत जायला. एकत्रच जायचं ठरलं होतं पण तिला शिल्पासाठी गिफ्ट घ्यायचे होते म्हणून ती जरा मागून निघाली.
गिफ्ट गॅलरी मध्ये गिफ्ट शोधत असतानाच तिला एकाने मागून हाक मारली..
" भाग्यश्री.. तू भाग्यश्रीच ना? ओळखलं का? अगं मी कुणाल तुझ्या सोबत कॉलेजला होतो. किती दिवसाने भेटतोय आपण?
तू अजिबात बदलली नाहीस.
होती तशीच आहेस.. "
" अय्या... कुणाल तू? तू इकडे काय करतोय? गर्लफ्रेंडला गिफ्ट वगैरे घ्यायला आला आहेस का? " ती मुद्दाम लाडालाडाने बोलली. हा कुणाल तिच्या प्रेमात होता हे तिला माहीत होतं. पण त्याला बोलायचं धाडस नव्हतं. पण आता तो बदलला होता.
" काय मग.. लग्न वगैरे केलं नाहीस ? आपल्या वेळच्या सर्वच मुली दोन तीन मुलांच्या आया झाल्यात. तू कशी बाकी राहीलीस? काही अडचण आहे का...? "
त्याने काळजीने विचारलं.
" अरे नाही तसं काही नाही.. " ती बोलणार तोच तिला त्याने थांबवलं..
" मला तुला एक गोष्ट सांगायची होती कॉलेजच्या दिवसापासून.. आता भेटलोय तर आताच सांगतो.. तू माझं पहिले क्रश आहेस. अजूनही तू आवडतेस मला. आताही.. " त्याने थेट प्रपोजलच मांडलं समोर..
" अरे थांब थांब.. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीस. आता काय उपयोग? अरे आता मी दोन मुलांची आई आहे. नवरा सुद्धा आहे छान. आज " मंगळसुत्र " घालायला विसरलीय फक्त.
त्याचा चेहरा एवढूसा झाला. एकमेकांचे नंबर शेअर करुन गिफ्ट खरेदी करुन ती निघाली दुकानाबाहेर.
खाऊगल्लीच्या अलीकडे कॉलेज होते. कट्ट्यावर कॉलेजचे मुलं बसली होती. तशी ती अनेकदा तिथून गेली होती, पण एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की मंगळसुत्र नसल्याने सर्वजण तिला अविवाहित समजत होते.
कट्ट्यासमोरुन जाताना.. एकाने कमेंट पास केलीच..
" जानेमन जानेमन.. पलट तेरी नजर.. "
ती सुखावली.. किती वर्षांनी तिच्यासाठी कोणीतरी कमेंट पास केली होती. कॉलेजला असताना व्हायचं असं. मधली दहा वर्ष नवरा, मुलं, संसार, नोकरी यातच गेला होता.
खाऊगल्लीत पोचली तेव्हा बाकी सर्वांनी अगोदरच खायला घेतले होते. तिने शिल्पाच्या हाती गिफ्ट देऊन तिला करकचून मिठी मारली.
मागच्या स्टॉलवर उभे असलेले दोन चाळीशीचे गृहस्थ तिला न्याहाळत होते.
तिला उगाच कसंतरी वाटू लागलं. त्यांची नजर तिला खुपू लागली. काहीवेळापुर्वी तरुण मुलांच्या नजरेने, त्यांच्या बोलण्याने सुखावलेली ती आता इतक्या ओळखीच्या लोकांतही.. इनसिक्योर झाली होती.
तिचा हात गळ्याकडे गेला. ज्याची कमी ती अजून पर्यंत आनंदात अनुभवत होती त्याचीच कमी तिला प्रकर्षाने जाणवू लागली. कसंबसं तिने खाणं संपवले आणि सर्वांना बाय करुन शिल्पा आणि ती टॅक्सीत बसली. टॅक्सीत शिल्पाबरोबर जुजबी बोलली पण मन नव्हते तिचं बोलण्यात.
बेल वाजवली... स्नेहाने दरवाजा उघडला.
हाय मम्मी.. हाय मम्मी या मुलांच्या हाकेकडे लक्ष न देता ती चप्पल काढून, पर्स सोफ्यावर फेकून थेट ड्रेसींग टेबल समोर गेली.
तिथे तिला तिचं ते हसणारे नाजूक मंगळसुत्र दिसलं.
लगेच उचलून तिने गळ्यात घातलं.
आता तिला खुप सुरक्षित वाटत होतं...
सुमेध घरी नसला तरीही...

No comments:
Post a Comment