..... एखादा दिवस .....
रात्रीच्या प्रचंड थकव्यानंतर खरंतर उठायला कंटाळाच आला होता. पण पोटापाण्यासाठी उठणे गरजेचेच होते. सलोनी अजूनही झोपूनच होती. तिला फारसं कामही नव्हते तरीही ती झोपली होती.
ताईची लाडकी होती ती.
सगळं आवरुन जेवणाची तयारी करणार तोच मोबाईलवर फोन आला.
समोर विलास होता.
" हॅलो..
झालीस का तयार? नऊ पर्यंत येईल तो. सगळं लक्षात आहे ना? मला विसरु नको..
मी येतोच दहा मिनीटांत "
माझं " हो.. नाही.. " न ऐकताच फोन बंद झाला. खरंतर मी विसरुनच गेले होते. साडेआठ वाजले होते.
पंधरा मिनीटात मी आरामात तयार होणार होती. विलासच्या सांगण्यानुसार मेकअप करायचा नव्हता, मग तर अजूनच सोप्पं झालं.
फिक्कट गुलाबी रंगाचा बांधणीचा ड्रेस, वर हिरव्या रंगाची ओढणी घेऊन भेट म्हणून मिळालेलं अत्तर फवारुन आरशात बघत असताना मागून सलोनी बोलली
" व्वा गं.. आज बाहेर ना?
मज्जा आहे तुझी. किती वाजता परत येणार? "
मी तिच्याकडे आरशातूनच बघून बोलले..
" नजर नको लावू.. रात्री जेवायला येईन थेट.. आणि यात " व्वा " काही नसतं.. बाहेर जायला लागलीस की समजेल तुलाही किती त्रास असतो ते. "
ती नुसतीच हसली.
इतक्यात विलास आला.
" लवकर लवकर.. " म्हणून तो ताईच्या खोलीत गेला.
मी लगेच ओढणी ठिकठाक केली एक वार आरशात बघून घेतले पर्स खांद्याला लावली तोच विलास पाकीट खिशात टाकत आला.
" चल की आता..
आता उचलून नेऊ की काय.. ? "
सलोनी खुदकन हसली. तिच्याकडे दुर्लक्ष करत मी सँडल घालून त्याच्यामागे पळतच गेले.
बिल्डींग खालच्या पानटपरीवरच्या रेडीओवर गाणं चालू होतं.
" तुझे देखा तो ये जाना सनम..... "
उगाचच मनात कसंतरी झालं.
विलासने त्याची बाईक सुरु केली होती. मध्ये पर्स टाकून बसली नेहमीप्रमाणे.
" पुढच्या सिग्नलला तो थांबलाय. जास्त काही सांगत नाही तुला माहीत आहे सर्व..
नऊ पर्यंत परत येईल असं ताईला सांगितलंय, त्यामुळे लेट करु नको. " तो उगाचच सुचना देत होता असं वाटलं. मी थोडीच नवीन होती?
" हो रे बाबा.. सगळं माहीत आहे मला. " मी वैतागून बोलले.
" असेल माहीती पण माझी जबाबदारी आहे आणि सांगणे माझे कर्तव्य आहे.. समजले ना?...... तो बघ सॅन्ट्रोच्या बाजूला उभा आहे तो. "
विलासच्या खांद्यावरुन मान उंचावून त्याच्याकडे पाहीलं. तिशीचा असावा.
नेव्ही ब्ल्यू कलरचा टीशर्ट, खाली जीन्स, पायात स्पोर्ट्स शुज, डोळ्याला गॉगल. शरीरयष्टी बरी होती.
बघता बघता विलासने गाडी त्याच्याजवळ उभी केली.
त्याला सलाम करत म्हणाला
" हां साहेब..
ही... "
" मला नावाशी काही देणं घेणं नाही.. हे घे... आणि जा तू.. " पाकीटातून पैसे काढून विलासच्या हातात कोंबले.
वाटलं सॅन्ट्रो त्याची असेल पण त्याने टॅक्सीला हात केला.
ड्रायव्हर सोबत काहीतरी बोलणे झाले. हो नाही हो नाही होऊन शेवटी तो तयार झाला.
" या मॅडम.. बसा... "
इतक्या वर्षात मला मॅडम म्हणून हाक मारणारा हा पहिला माणूस मी पाहीला..
पण मग लगेच भानावर आले...
शेवटी तोही त्यातलाच
त्याच्या चेहऱ्याकडे पाहत आत जाऊन बसले. बाजूला येऊन बसला.
टॅक्सी सुरु झाली...
" कुठे घेऊ साहेब? " आरशातून माझ्याकडे बघत ड्रायव्हरने त्याला विचारले.
" दादर.. शिवाजी पार्क "
मी नेहमीप्रमाणे सीट ला पाठ टेकवून बसले.
त्याचे लक्ष पुर्णपणे हातातल्या मोबाईल वर..
मध्येच थोडा हसत होता. मग मी सुद्धा बाहेर बघू लागले... बंद काचेच्या बाहेर...
टॅक्सी सिग्नल ला थांबली..
त्याच्या बाजूने खिडकीवर टक टक झाली..
" साब.. लो ना.. सिर्फ वीस रुपयेे का है.. मोगरे का है.. मॅडम के लिए लो ना? "
फ्रॉक घातलेली दहा - बारा वर्षाची काहीशी कळकट दिसणारी पण चुणचुणीत मुलीने हातातले गजरे वर केले होते.
मोगऱ्याचे गजरे पाहीले नी माझ्या आठवणी जाग्या झाल्या... डोळ्यात चमक आली..
तीच बहुतेक त्याने पाहीली.
शंभरची नोट पुढे करुन पाच गजरे घेतले. त्या मुलीला बहुतेक अनपेक्षित असावं ते... माझ्याप्रमाणेच.
तीन गजरे माझ्या समोर केले आणि दोन ड्रायव्हरला दिले..
" भाऊ लटकवा समोर.. छान सुगंध येत राहील..
तुम्ही माळा की.. मला हा सुगंध खुप आवडतो. "
गजरा केसात माळताना होणाऱ्या हालचालीकडे तो पाहीलंच. या विचाराने डोळ्याच्या एका कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत गजरा माळला. त्याने पाहीलं नाही... पण समोरच्या आरशातून ड्रायव्हर मात्र पाहत होता. अधाशीपणे.
सिग्नल सुटला. वाऱ्यासरशी सुगंध भरला...
तो मोहरला.. मला सवयच होती.
" खरंतर विचारणार नव्हतो.. पण तुमचं नाव काय? " त्याचे माझ्याप्रती असलेले मौन तुटले
" मला स्विटी म्हणतात.. " मी थोडंसं सावरुन बसत उत्तर दिलं.
" स्विटी...?
हे खरं नाव नसेलच... मला माहीत आहे तुम्ही नाव सांगत नाही.. आज दिवसभर आपण सोबत आहोत तर एकमेकांशी बोलायला नाव पाहीजे.
मी आजपुरतं तुम्हाला नाव देतो... सुगंधा.. चालेल? "
नाही बोलणं मला परवडणारे नव्हते. प्रत्येकाची वेगवेगळी आवड..
" भाऊ छानसी गाणी वगैरे नाहीत का? " त्याने टॅक्सीवाल्याला विचारलं.
" आहेत की... " म्हणून त्याने गाणी चालू केली.
" सोलह बरस की बाली उमर को सलाम.. प्यार तेरी पहली नजर को सलाम.. "
प्रत्येक गाण्यात आठवणी होत्या माझ्याकडे..
मी त्याच्याकडे पाहू लागले. त्याने गॉगल काढला.
टीशर्ट च्या मध्यभागी अडकवला आणि माझ्याकडे एकवार पाहीले.
" मी हात हातात घेऊ तुमचा? " त्याने विचारलं.
झाला सुरु... कितीवेळ तू राहणार रे?? पुरुषच शेवटी तू?
" हातच का? आज मी संपुर्ण तुमची आहे... टॅक्सीत...बसून "
" नाही फक्त हात... " त्याने मला मध्येच थांबवत स्वतःचा हात पुढे केला.
त्याच्या हातात गेला.
त्याचा हात थंड होता.. अजूनपर्यंत थंड हाताचा अनेक वर्ष स्पर्श झालाच नव्हता. सर्व गरम... वखवखलेले..
पुढे काहीच नाही.. तो नुसता हाताकडे पाहत होता. क्षणभर हात सैल झाला.. आणि त्याने बोटात बोटं गुंफली.
आता हा सुरु होणार..
पण त्याची नजर शुन्यात गेली.. काहीतरी आठवत असावा..
" साहेब.. शिवाजी पार्क आलं..मी इथे पार्क करतो. पुन्हा इथेच या.. मी टॅक्सी सोडणार नाही. " ड्रायव्हरच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली.
" हो... चला तुम्ही सुगंधा... "
खाली उतरुन माझ्या खाली उतरण्याची वाट बघत उभा राहीला.
बहुतेक इथे कुठेतरी लॉज असावा.
मला न विचारता हात पकडला आणि समोरच्या कट्ट्याकडे नेऊ लागला.
" नुसतंच फिरु नका.. जरा माणसांकडेही बघा. बघा ते बसलेले जोडपे. ते काठी टेकत चालणारे आजोबा पहा. ती आज्जीचा हात पकडून बागडणारी छोटी मुलगी पहा. " त्याच्या डोळ्यात चमक होती. मी आपोआपच त्याची आज्ञा पाळू लागले. न पाळूनही काय करणार?
आज मी त्याची होती.. रात्री नऊ पर्यंत.
" पाहताय ना? " त्याने विचारलं.
" हो.. छान आहे.. " मी बोलून टाकलं. भरपूर चालल्या सारखं वाटलं. कट्ट्यावर दिसणारी माणसं मी सुद्धा पाहू लागली.
मला ती दिसायचा संबंधच नव्हता.. खोलीतल्या पाच मुली, बिल्डींगमधल्या इतरजणी आणि रोज रात्री येणारे भुकेले चेहरे. हेच नशिबी..
" मंदिरात जाऊ या? " त्याने विचारलं.
समोर गणपतीचे मंदिर होते.
वर्षातून एकदा ताई सर्वांना साईबाबांच्या दर्शनाला न्यायची बाकी जे काही देव ते भिंतीवर टांगलेले. बाकी प्रत्यक्ष मंदिरात जाणे व्हायचेच नाही.
अगरबत्तीचा सुगंध... प्रसन्न वातावरणात घंटेचा ध्वनी आणि त्यात प्रदक्षिणा घालणारे पवित्र स्त्री-पुरुष...
मला माझ्या अपावित्र्याची लाज वाटू लागली.
क्षणभर पाय थबकले.
त्याने डोळ्यानेच विचारले..
" काय झालं? "
मी मानेनेच नको म्हटले...
" का? का नको? लोक इथे केलेल्या चुकांची माफी मागायलाच येतात, आपली पापं देवाकडे सोपवून उजळ माथ्याने बाहेर पडतात. चला या "
हात धरुनच आत नेलं..
गणपतीसमोर हात जोडून स्वतःकरीता काही मागणं सुचलंच नाही.
गावी असलेल्या आई बहिणींची आठवण आली त्यांना सुखी ठेव... एवढंच मनात आलं..
डोळे उघडले तेव्हा तो माझ्याकडे बघत होता. हसत होता..
" यायचं नव्हते... ना?
या जगात अपवित्र असं काही नसतं... अपवित्र असतात त्या माणसाच्या भावना.
चला काहीतरी खाऊन घेऊ.. "
खरंच हा माणूस मला समजणे कठीण झाला होता. आतापर्यंत याने कोणतीही अशी हालचाल केली नव्हती ज्यासाठी त्याने मला आणलं होतं. काहीतर टॅक्सीतच सुरु होतात.
बाजूलाच वडापावची गाडी लागली होती.
डीशमध्ये तीन वडापाव घेऊन तो जवळ आला.
मी लगेच एक उचलला.
भुक लागलीच होती.
" माहीत आहे तुम्हाला भुक लागलीय म्हणूनच दोन वडापाव घेतलेत तुमच्यासाठी.. वन सेक.. डीश पकडा मी बिसलेरी घेऊन येतो "
म्हणून माझ्या हातात डिश सोपवून बिसलेरी घेऊन आला.
वडापाव संपले.
" चला आता वर्तुळ पुर्ण करुया... म्हणजे.... टॅक्सीकडे जाऊया.. " तो हात पुसत म्हणाला
" ते नाही? मला वाटलं... " मी न रहावून विचारले
मला अर्धवट तोडत म्हणाला. " ही समोर दादर चौपाटी आहे.. पण आपण तिथे नको जाऊया. दुसरी छान जागा आहे तिथे जाऊ. "
माझा हात पकडून तो निघाला सुद्धा.
टॅक्सीत ड्रायव्हर पेपर वाचत बसला होता. तो सावरुन बसला.
उघडलेल्या दरवाजाकडे हात दाखवत म्हणाला
" या बसा.. आरामात, काही घाई नाही "
ड्रायव्हरकडे बघत म्हणाला
" भाऊ.. सी लिंक वरुन घ्या. जुहू चौपाटी. "
ड्रायव्हरने आठ्या आणल्या
" उन्हात जुहू चौपाटी? त्रास होईल.. एक लॉज आहे ओळखीचा तिथे नेऊ का? जरा आराम वगैरे करा आणि मग जा चौपाटीवर "
माझ्याकडे सुचक बघत ड्रायव्हर बोलत होता.
" हे बघा मी सांगतोय तेच करा आणि यांच्याकडे बघणे जरा बंद करा.. "
आवाज वाढला होता त्याचा.
आपली चोरी पकडली गेली हे समजल्यावर तो ओशाळला....
टॅक्सी सुरु झाली.
पुन्हा हात हातात गुंफले गेले.
गाणं सुरु होतं...
" लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो... "
बघता बघता सि लिंक चा पुल आला.
वरळी दुध केंद्र, वरळी सी फेस, टॅक्सीतूनच दाखवले.
मी काय आहे ते विसरुन आजूबाजूच्या गोष्टी नजरेत साठवून घेऊ लागले.
सि लिंक ची भव्यता मनात भरली. प्रत्येक जागेची तो माहीती देत होता. टॅक्सीवालाही अधून मधून अधिकची माहीती सांगत होता..
इतकी वर्ष मुंबईत राहून कधीही न पाहीलेल्या जागा आणि ठिकाणं दिसतं होती.
जुहु चौपाटी आली.
टॅक्सीतून उतरताना माझ्या शरीराचा पुसटसा स्पर्श त्याला झाला...
मी शहारले.. तो मात्र निर्विकार होता.
समोर दिसत होता भला मोठा समुद्र.. फुगेवाले, आकाशपाळणे, खाद्यपदार्थ विकणारे.. उन्हामुळे गर्दी कमी होती. काही जोडपी हातात हात घालून फिरत होती. कोणी आईस्क्रीम खात होतं तर कोणी कापूसगोळा, कोणी पाण्यात डुंबत होतं तर कोणी समुद्राकडे नजर लावून शांत बसलं होतं.
लहानपणी बाबांसोबत गेलेल्या जत्रेची आठवण आली. डोळ्यात पाणी येतच होतं तर..
तो बोलला...
" कुल्फी खाऊया?
हो नाही चं उत्तर न बघताच तो दोन कुल्फ्या घेऊनही आला.
" ही ओढणी डोक्यावरुन घ्या. म्हणजे उन्हाचा त्रास जाणवणार नाही.
मी ओढणी बांधेपर्यंत त्यानेही एका हाताने गॉगल डोळ्यावर चढवला.
" कुल्फी छान आहे " हे मी न सांगताच त्याला कळालं. हातात हात घालून या टोकापासून त्या टोकापर्यंत नुसते चाललो. मला प्रत्येक गोष्ट दाखवत दाखवत पुन्हा माघारी फिरला.
आकाशपाळणे वाला कोणी नव्हते म्हणून तिथेच बसला होता. दोघांना बघून लगेच पुढे आला.
" साब पचास रुपया.. आप जैसे बोलोगे वैसे घुमाऊंगा. "
माझ्या डोळ्यातली इच्छा त्याला दिसली होती.
" दोनो बैठेंगे.. "
हात देऊन पाळण्यात बसवले आणि मग स्वतः बसला.
चक्र सुरु झाले...
जसजशी गती वाढू लागली तशी भिती वाटू लागली. नुसत्या हाताचा आधार कमी पडू लागला.
एक क्षण असा आला की मिठी पडलीच माझी त्याच्या भोवती. भरपूर वेळ झाला असावा.
" उठा.. पाळणा थांबलाय.. " त्याच्या आवाजाने डोळे उघडले.. पटकन मिठी सुटली. गालावर लाली आली....
तो मात्र निर्विकार...
मी त्याच्या प्रेमात पडतेय की काय असं वाटू लागलं.
अजून मला त्याचं नावही माहीत नव्हतं.
" मी पाण्यात चालू जरा वेळ? " मी हळुवार येणाऱ्या लाटांकडे पाहत विचारलं.
" हो... चला की मी सुद्धा येतो सोबत. "
हातात हात घालून आम्ही दोघेही कितीतरी वेळ पाण्यातून चाललो. चप्पल बुट दोघांच्याही हातात.
मला त्याला बिलगावसं वाटत होते.. इतकी पुरुषी शरीरं पाहीली होती... नकोशी.. पण त्याच शरीर हवहवंस वाटत होतं.. त्याच्या अंगाला येणारा मंद मस्क चा सुवास मला मोहीत करीत होता.
" भुक लागलीय ना? चला जेवून घेऊ? रस्त्याच्या पलीकडे एक हॉटेल आहे. छान जेवण असते तिथे. " त्याने एकदम विचारले.
मी घड्याळात पाहीलं दोन वाजत होते. म्हणजे पाच तास होऊन गेले होते. अजून सहेतूक एकदाही स्पर्श केला नव्हता त्याने. उलट मीच त्याच्या सहवासाला आतूर झाली होती.
हॉटेल मध्ये गेल्यावर फार काही न मागवता थाळीच मागवली. समोरासमोर बसून जेवताना मी त्याच्याकडे पाहत होती आणि तो माझ्याकडे.
माझ्या नजरेने कित्येक घायाळ व्हायचे.. तो मात्र शांत.. त्याच्या डोळ्यातले भाव बदलतच नव्हते..
जेवत असताना बाजूच्या टेबलवर बसलेला माणूस माझ्याकडे सतत पाहत होता.
त्याच्या बघण्यावरुन समजलं की याला मी काय आहे ते समजलंय.
हात धुताना दोघेही बेसिनजवळ एकत्रच गेलो. मी हात धुताना तो माझ्याकडे पाहत होता.. चेहऱ्याकडे.. काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत असावा जणू.
" आता?? " त्याने विचारलं..
" तुम्ही सांगा.. का आणलंय मला बाहेर? सवय नाही मला या सर्वाची. आपुलकी, सहानुभूती दाखवणार असाल तर प्लीज... मला त्याची गरज नाही. मन मेलेले असतं आमचं. आम्हाला फक्त हिशेब येतो. इस हात ले उस हात दे.. सौदा शरीराचा होता... मनाचा नाही. आज शरीर तुमचे आहे.. काय करायचे ते करा.. पण हे असं नको. खरंच सवय नाही मला याची. " मी त्याचा धरलेला हात दाबत रागारागाने बोलली.
तो मंद स्मित करत होता.. जणू मी जे बोलले त्याचा काहीच परीणाम नाही झाला.
" मी तेच तर करतोय. सोबत शरीर घेऊनच फिरलो की तूमचे. काय करायचंय आणि नाही करायचं हे माझ्या मनावर आहे... नाही का?
तसाच सौदा ठरला होता बहुतेक.
का? कशाला? या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला शेवटच्या तासात देईनच. तोवर मिळालेले क्षण जगून घ्या... मुक्तपणे.. "
बोलता बोलता टॅक्सीजवळ पोहचलो.
" या साहेब.. झालं जेवण? कुठे जायचं आता? " ड्रायव्हरने माझ्याकडे बघणे टाळलं.
" थेट गिरगाव चौपाटी. " क्षणाचाही विलंब न लावता तो बोलला.
आणि दरवाजा उघडला. त्याच्याकडे बघत मी आत जाऊन बसले. तो बाजूला येऊन बसला आणि टॅक्सी सुरु झाली.
भरपूर वाट बघूनही त्याचा हात हातात येईना म्हणून मीच हात पुढे केला. तसा तो हसला. हसल्यावर एक बारीकशी खळी त्याच्या गालावर पडत होती. मी जरा त्याच्याजवळ सरकली.
त्याने मोबाईल काढला आणि त्यात बघून सकाळसारखा हरवला.
मला झोप येऊ लागली. बहुतेक त्याच्या खांद्यावरच झोपली असावी. कारण जेव्हा त्याने उठवलं तेव्हा मी त्याच्या खांद्यावरच होते. सहा वाजले होते.
" सुगंधा मॅडम... ही चौपाटी.. जायचंय ना बघायला. " त्याने विचारलं.. त्याच हसऱ्या चेहऱ्याने.
" नाही.. आपण असेच फिरुया.. टॅक्सीत? " मी केलेला प्रश्न ऐकून तो हसला.. सोबत ड्रायव्हरपण हसला..
" ओके.. भाऊ दोन राऊंड होतील ना.. आरामात? आपल्याला साडे आठला जिथून सुरुवात केली तिथे जायचंय. त्या हिशेबाने फिरवा गाडी. " त्याने हुकूम सोडला.
बाहेरचा उजेड जसजसा कमी होत होता तसा टॅक्सीमधला अंधार वाढत होता.
गाणं चालू होतं...
"पहली पहली बार बलिए...
दिल गया हार बलीए...
रब्बा मैंनू क्या हो गया.... हाए...
दिल का करार खो गया... हाए... "
गाण्याच्या धुंदीत मला राहवले नाही आणि एकदम मी त्याला स्वतःकडे ओढले. ओठाला ओठ टेकवणार तोच तो बोलला....
" स्टॉप.. इट...
अजूनही नाही कळलं का की मी हे सर्व करायला नाही आणलंय तुम्हाला.
ऐका.. खरंतर मी हे नेहमी शेवटी सांगतो.. पण तुम्हाला नाही रहावलं म्हणून सांगतो.
याच दिवशी मी माझं प्रेम.. माझी पत्नी गमावून बसलो. ती तुमच्या वस्तीत यायची.. समाजसेवीका म्हणून. फार वय नव्हते तिचं. जाण्याच्या दिवशी तिने माझ्या हातात हात घेऊन.. अगदी मी तुमचा घेतला होता तसा, घेऊन म्हणाली..
मला एक वचन द्या. या मुलींना " एखादा दिवस " माझ्यासारखा जगू द्या. मुक्तपणे.. स्वच्छंदीपणे बागडू द्या त्यांना. त्या नरकातून सुटका करणे आपल्याला जमेल असं वाटत नाही पण सुखाचा एखादा दिवस तुम्हाला देणे नक्कीच शक्य आहे.... "
माझ्या हातावर अश्रू पडला...
गरम.. त्याचा..
त्याचे डोळे झरत होते.
भरपूर वेळ शांतता राहीली.
गाणं वाजत होते....
" छोडेंगे ना हम तेरा साथ...
ओ साथी मरते दम तर.. "
टॅक्सी पळत होती..
" साहेब.. इथेच थांबू की गल्लीत घेऊ? "ड्रायव्हरच्या आवाजाने दोघांची तंद्री तुटली.
घड्याळात पाहीलं.. साडेआठ वाजले होते.
तो खाली उतरला. ..
मला उतरण्याची जागा करुन द्यायला..
विलास अगोदरच तिथे होता. त्याच्या मागे बसले.. गल्लीच्या कोपऱ्यात तो दिसनासा होईपर्यंत त्याच्याकडे बघत राहीले... कृतज्ञतेने....
( तन्वीर सिद्दीकी यांच्या " जमलं तर " या वर आधारीत)

अप्रतिम कथा,ओघवता डौलदार बाज
ReplyDeleteउत्तम लेखन👍
ReplyDelete