.... जन्टलमॅन....
मी नुकतीच कॉलेजला जायला सुरुवात केली होती. एक तर मराठी शाळेतून, एकदम इंग्रजी वातावरणात गेल्याने आधीच सगळीकडे गोंधळ होतो. त्यातही माझ्या सोबत माझ्या शाळेतला, क्लासेस मधला एकही विद्यार्थी, मित्र असा कोणी नव्हता.
हिंदूजा कॉलेज तसे महागडे म्हणून आमच्या बरोबरच्या मित्रांनी ते टाळलेच. मी दोनच कॉलेजचे फॉर्म आणल्याने आणि त्यातही दुसर्या कॉलेजच्या लिस्ट मध्ये नाव येईल अशी सुतराम शक्यता नाही हे जाणवले तेव्हा लगेच हिंदूजाला अॅडमिशन घेऊन टाकली.
साधारण महीना झाला असेल. मित्र - मैत्रीण जमण्याचे सोडा. साधे बोलणे सुद्धा जमायचे नाही. प्राध्यापकांनी प्रश्न विचारला की.. उत्तर न देता खाली बसणे अविरत सुरु होते.
त्यातही कोणी इंग्रजीत बोलायला आले की मी सरळ मराठीत बोलायला सुरु करायचो.. मग मांडवली होऊन हिंदीतून संभाषण व्हायचे.
हिंदूजा चर्नीरोड च्या त्या टोकाला आणि माझे घर या टोकाला. त्यामुळे चालत जाणे किंवा मग सायकल चालवत नेणे हेच बेस्ट होतं.
अशाच एका दिवशी कॉलेज संपल्यावर, नेहमीप्रमाणे महर्षी कर्वे रोड वरुन घरी परतताना स्टेशननंतर एक मशीद आहे अगदी तिच्या समोर एकाने मला थांबवले.
" एक्सक्युज मी.. विल यू प्लीज हेल्प मी? "
अचानक असं कोणी थांबवल्यामुळे मी क्षणभर गांगरुन गेलो.
आधीच इंग्रजी सोबत वाकडं त्यात हा मनुष्य माझ्यासोबत फ्ल्युएंट इंग्रजीत बोलतोय म्हटल्यावर..
" यस, या.. या... ओके, थँक्यू, सॉरी एवढंच काय ते इंग्रजी व्यवस्थित बोलू शकणारा मी गडबडलोच.
तो बोलत होता.. इंग्रजी बोलता येत नसलं तरी समजत होतं. त्याचाच अनूवाद करुन सांगतो... हो.. आताही नाही जमत तेवढे 😂
" नमस्कार, मला तुमची थोडी मदत हवीय. मी मंत्रालयात कामाला आलेलो. पण तिथे कोणीतरी माझे पाकीट मारलं. मी तिथून चालत इथपर्यंत पोहचलोय. मला ओशिवराला जायचंच. तिथे माझी पत्नी हॉस्पिटलला आहे. प्लीज माझी थोडी मदत करु शकाल का? फक्त बसच्या तिकीटापुरते पैसे द्या.
माझे काम झाले की मी स्वतः येऊन तुमच्या घरी येऊन पैसे देईन."
मी त्याच्यावरुन नजर फिरवली.
चांगला साडेपाच सहा फुट उंच माणूस, व्यवस्थित कडक इस्त्रीचा शर्ट इन केलेला, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा चष्मा, अर्धवट पांढरी फ्रेंच कट दाढी, हातात टाईम्स ऑफ इंडिया चा कोरा करकरीत पेपर, पायात चमकणारे शुज. खरोखरच तो एखादा सरकारी कर्मचारी वगैरे किंवा ऑफिसर वगैरे असावा असे वाटत होते.
त्यावेळी खिशात फारसे पैसे असायचे असेही नाही. दर शनिवारी पॉकेटमनी म्हणून मिळणारे पन्नास रुपये साठवून साठवून फार फार तर शंभर - दिडशे रुपये खिशात असायचे.
त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खरोखरच अगतिकता दिसत होती.
मी विचारले..
" किती लागतील? "
"बसच्या तिकीटापुरते.. पंधरा वीस रुपये चालतील. " तो शांतपणे बोलला.
मला अचानक स्वतः देवदूत असल्याचा भास झाला. एका गरजू व्यक्तीच्या मदतीला धावून जाणारा देवदूत.
खिशातून वीस रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले..
" थँक्यू, सो मच.. या पेपरावर तुमचे नाव आणि पत्ता लिहा.. मी उद्या किंवा परवा तुमचे पैसे परत आणून देईन. " त्याने कोरा करकरीत टाईम्स ऑफ इंडिया माझ्या समोर केला.
" त्याची काही गरज नाही.. असू दे.. असू दे. " माझ्या डोक्यावर चमकणारी चक्र वाढत चालली होती.
" नाही.. असं कसं.. लिहा तुमचे नाव आणि पत्ता मी पैसे आणून देईन. " त्याने विनवणीच्या सुरात सांगितले.
" ठिक आहे.. " म्हणून मी त्याने पुढे केलेल्या पेपरावर माझे नाव.. आणि पत्ता लिहिला.
" खुप खुप उपकार झाले.. तुमचे. " म्हणत त्याने माझ्यासमोर हात जोडले.
तो घाईघाईत बसस्टॉपकडे निघाला.
मी सुद्धा डोक्यावर फिरणारी अदृश्य सोनेरी चमचमती चक्र घेऊन घरी गेलो. घरी गेल्यावर आईला ही गोष्ट सांगितली.
आईने कौतूक केलं.. अशी चांगली कामे करत रहा, नेहमी असे सांगितले.
त्यानंतर दोन तीन दिवस गेले..
ती व्यक्ती घरी आली नाही.
वीस रुपये काही एवढी मोठी रक्कम नव्हती. मी विचार करु लागलो की, त्याची बायको आजारी होती.. हॉस्पिटलला होती.. कदाचित तिचे काही बरे वाईट झाले असेल..
काही दिवसांनी मी ही गोष्ट विसरुनही गेलो..
पुढे साधारण दोन वर्षांनी.. मी लालबागला काळाचौकीच्या एका कॉम्प्युटर इन्स्टीट्युट मध्ये कॉलेज सुटल्यावर कोर्स करत होता. हातात सायकल असल्याने नेहमी सायकल वरच जायचो तिकडे.
अशाच एका दिवशी मराठा मंदीर समोरुन जात असताना एका व्यक्तिने हात केला. मी सायकल थांबवली.

अचानक " देजा वू " चा अनुभव आल्यासारखे जाणवू लागलं..
पुन्हा तेच.
हातात कोरा करकरीत पेपर, कडक इस्त्रीचा शर्ट, फ्रेंचकट दाढी..
हे कुठेतरी पाहिल्यासारखं, अनुभवल्यासारखं आठवायला लागलं.
मी काही न बोलता..
पॅडल मारले...
पुढे जाऊन आठवू लागलो कुठे.. कुठे पाहिलंय याला? तो आवाज कुठे ऐकलाय?
अचानक तो प्रसंग आठवला.
अरे हो.. हा तोच माणूस.. ज्याला मी वीस रुपये दिलेले. ज्याची बायको आजारी होती..
मी इन्स्टीट्युटमध्ये पोहचलो तेव्हा तिथल्या आरशात माझ्या डोक्यावर दोन लांब कान आणि तोंड गाढवाप्रमाणे होत आहे असं दिसू लागलं. नंतर मग स्वतःचेच हसायला आलं..
घरी जाऊन ती गोष्ट आईला सांगितली..
ती सुद्धा हसली आणि म्हणाली..
" जाऊ दे.. तू मदत म्हणूनच पैसे दिलेस ना? मग झालं तर.. "
त्यावेळी आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स यायचा. त्यात वाचकांची पत्र हा भाग असायचा बहुतेक. अशाच एका सकाळी त्यातल्या एका पत्रात लिहिले होते ते वाचून मला धक्काच बसला.
पत्रात लिहिलेला मजकूर साधारणपणे असा होता..
.. आमच्या शेजारी एक गृहस्थ राहतात. पुर्वी चांगले कामाला होते. परंतू दारुच्या व्यसनामुळे त्यांची नोकरी गेली. नंतर मग त्यांनी घरातच चोरी करायला सुरुवात केली. मुलाच्या - सुनेच्या पाकीटातून, कपाटातून पैसे चोरायचे. घरी हे लक्षात आल्यावर मुला-सुनांनी पैसे लपवून ठेवायचा सुरुवात केली. मग ते गृहस्थ जास्त वेळ घराबाहेरच राहू लागले. सकाळी व्यवस्थित ऑफिस ला जाताहेत असे कपडे घालून जात, मात्र संध्याकाळी येताना भरपूर दारु पिऊन येत आणि शांत झोपत. घरातले सर्व आश्चर्य करतच होते की एवढी दारु प्यायला यांच्याकडे पैसे कोठून येतात?
नेमके मला काल ते ग्राँट रोड एका बस स्टॉपजवळ मला ते दिसले.
एका व्यक्तीबरोबर ते बोलत होते. मी जवळ जाऊन ते काय बोलताहेत ते ऐकलं.
ते दुसर्या व्यक्तीला मदतीची याचना करत होते. बायको आजारी असून हॉस्पिटलला आहे, माझे पाकीट मारले, मला बसच्या तिकीटापुरते पैसे द्या, मी तुमचे पैसे घरी येऊन परत करेन. त्यांच्याकडे पाहून म्हणजे त्यांच्या व्यवस्थितपणा कडे पाहून आणि इंग्रजी बोलण्याच्या लकबीमुळे लगेच फसून पैसे देत होते. मी तिथे जाऊन त्यांना खडसावले तर ते तिथून पळून गेले.
या परिसरातल्या लोकांना आवाहन आहे की असे कोणी गृहस्थ दिसले तर पैसे देऊ नका. "
म्हणजे...
मी दिलेले पैसे दारुवर खर्च झाले होते...
मी तर त्याला जन्टलमॅन समजून पैसे दिले होते.
- बिझ सं जय ( २७ नोव्हेंबर, २०१६)

No comments:
Post a Comment