सुगंध मोगरा.....
जेव्हा तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने मोगऱ्याचा सुगंध येणारं अत्तर लावलेलं. मी याआधी अनेकदा तो सुगंध घेतला होता परंतू हा तिचा सुगंध काहीतरी वेगळाच वाटत होता, मला ती आवडू जी लागली होती...
वो प्यार था या कुछ और था.. हे मला ही ठरवता येत नाही..
पावसाळ्यात भरपुर भिजलो तिच्यासोबत..
तेव्हाही तो मोगऱ्याचा सुगंध मी भरभरुन घ्यायचो. कितीही पाणी पडलं तरी तो सुगंध काही कमी व्हायचा नाही
एकच कॉलेज.. माझे संपले की तिचे सुरु होणार.. पण मी थांबायचो तिच्यासाठी.. त्या क्षणभराच्या मोगऱ्याच्या सुगंधासाठी. ती येत असली की मला तो सुगंध आपोआपच जाणवू लागायचा. दुरुनच ती दिसली की तो सुगंध हळूहळू जवळ येत जायचा.. ती येण्याअगोदरच मोगऱ्याचा सुगंध माझ्याकडे पोहचायचा. कदाचित मी तिच्या प्रेमात नव्हतो तर त्या सुगंधाच्या प्रेमात होतो.
एक दिवस तिने दुसर्या सुगंधाचे अत्तर लावलेलं.. मला तेव्हा जाणवलं की ती एवढी काही सुंदर वगैरे नव्हती. सुगंध मनुष्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.. तसंच माझंही झालं होतं..हळूहळू तिची ती मोगऱ्याची अत्तराची बाटली संपली..
मी तिला सांगितले बघ ना पुन्हा मिळते का तशीच.. पण तिला नाही मिळाली, तिच्या काकांनी बाहेरुन आणलेली कुठूनतरी... तिचा सुगंध कमी कमी होत गायबच झाला...
मग असा एक क्षण आला ज्यात तिने मला सांगितले की... मला विसर.
मी... हो... बोललो
भर पावसात भिजत गेलो, नाही पाहू शकले अश्रू कोणी....
खुप वर्षांनी बायकोने अत्तर आणले होते. अगदी तोच सुगंध.. काही फरक नाही. बाटली इंपोर्टेडच होती. सुगंध पुन्हा चित्तवृत्ती जागृत करुन गेला. पावसात भिजूनही सुगंध गेला नाही...
मग एक दिवस हातातून ती बाटली पाडली.. दिवसभर खोलीत सुगंध राहीला, नी मी खोलीबाहेर. मोगऱ्याचा सुगंध तसा डार्क म्हणून बायकोने तो घालवला...
माझ्या मनातला तो सुगंध मात्र पटकन कमी होणार नव्हता.. तो गेल्यावेळी प्रमाणेच हळूहळू कमी होणार होता.....
तिला शोधलं.. नवरा, गोड मुलगी.. सुखात होती ती... पण आता तिला तो मोगऱ्याचा सुगंध नव्हता....
आजही कुठेही तो सुगंध आला की पुन्हा मी त्याच विश्वात जातो. ते क्षण जगतो. पावसात भिजतो.. सुगंध भरभरुन घेतो, मग तो मोगऱ्याचा सुगंध हळूहळू कमी व्हायला वेळ घेतो...
मागील काही वर्षे तो सुगंध हरवलाय माझ्या आयुष्यातून.. बघा कोणाला सापडतोय का?
जगू द्या मला त्याच मोगऱ्याच्या सुगंधाचे दिवस... आणि मरेन तेव्हाही माझ्यावर मोगऱ्याची फुलेच वाहा..
त्या प्रवासाला जातानाही मला त्या मोगऱ्याच्या सुगंधाच्या आठवणी घेऊन जायच्या आहेत.....

No comments:
Post a Comment