बांडगुळ
आज पुन्हा तो दिसला.गटाराची साफसफाई करुन जमवलेली गटारघाण पालिकेच्या गाडीत टाकायला धावत होता.....
गेल्यावर्षी पावसाळ्यात डांबरवाल्यासोबत आलेला तो. डांबर लावणाऱ्या सोबत याला बघून जरा विचित्रच वाटलं, कारण डांबरवाले हे रस्त्यावर राहणारे वाघरी लोक, त्यात हा गोरा गोरा, उंच, पण दारुने खंगलेला, आणि मराठी. चौथ्या मजल्यावर डांबर लावायचे काम त्यामुळे डब्यात डांबर भरुन देण्यासाठी त्याला मजूरकर म्हणून आणलेलं. तो तरी शंभर दिडशे रुपयाची दारु प्यायला मिळणार म्हणून दिवसभर खपायला आलेला. रविवार होता म्हणून मी सुद्धा बिल्डिंगखाली थांबलो. एकीकडे काम करता तो माझ्या सोबत बोलतही होता..
" माझ्या दिसण्यावर जाऊ नको मी खुप श्रीमंत आहे. दोन दुकानं आहेत माझी. भाऊ सांभाळतो. तुला ते गिरगावातलं ### दुकान माहीत असेल ना. तेच माझ्या बापाने सुरु केलेलं, एक नंबर भांडी मिळायची आमच्या दुकानात. वडील खुप लाड करायचे आम्हा दोन्ही भावांवर. मी मोठा म्हणून माझ्यावर जास्त.....
हसतो काय रे तू?
बारावी शिकलोय मी भवन्स मधून, काय स्साले कॉलेजचे दिवस होते, बाबा रोज १०० रुपये द्यायचे खर्चाला, जाम मजा करायचो, हिरो होतो कॉलेज चा मी. ( हे मात्र पटलं.. त्याची चेहरेपट्टी आणि रंग त्याच्या जुन्या रुपाची ओळख धरुन होत्या). "
"अच्छा मग?? काय झालं?? "- मी.
" काय झालं म्हणजे?? " - तो.
" हे डांबराचं काम का करताय तुम्ही? " - मी.
" हे होय, ते असंच घरी बसून बसून कंटाळा म्हणून टाईमपास साठी " - तो
जेवणाची वेळ झाली म्हणून मला घरातून हाक आली.
दुपारच्या सुट्टीनंतर तो पिऊन आला. एक दोनदा डांबराचा डबा सांडला म्हणून ज्याने कंत्राट घेतलेलं त्याने त्याला अर्ध्या दिवसाची मजूरी देऊन घरी पाठवलं. दुसर्या दिवशी तो आला पुन्हा. पोटात दारु नसली की बरा असायचा. आमच्या पिताश्रींनी जुने शालीमार आणि डांबर नेऊन टाकायला त्याला पैसे दिले परस्पर, हा सौदा मला समजला तेव्हा मी त्यांना सांगितले विसरा पैसे आणि कचरा सुद्धा आपल्यालाच न्यावा लागणार, तो दोन तीन दिवस इकडे फिरकणारही नाही बघा..
आमच्या बिल्डींग मध्ये राहणारे एकजण त्याच्याशी बोलताना पाहीलं म्हणून त्यांना जाऊन त्याच्या बद्दलची माहीती विचारली.
तो खरोखरच चांगल्या घरातला होता. दुकानात मात्र जात नव्हता. वडील होते तोपर्यंत त्याला सांभाळून घेतले.. त्याला पैसा पुरवला नंतर नंतर दुकानात बसून गल्ल्यातलेच पैसे नेऊन दारु पिऊ लागला म्हणून वडिलांनी त्याला घरीच राहायला सांगितले. लग्न करुन दिले पण दारुमुळे ती सुद्धा सोडून गेली. भावाचं लग्न झालं, तो नियमित दुकानात जाऊ लागला. नंतर काही महिन्यांनी वडील वारले मग याच्या पैशांची आबाळ सुरु झाली. सुरुवातीला भावाने पैसे दिले काही दिवस पण मग हा अधिकार मागू लागला म्हणून दुकानातला हिस्सा पैशांच्या रुपात दिला. मोठी रक्कम होती पण वर्ष भरात संपली. मग दारुसाठी मिळेल ते मजूरीचं काम.
बोलत असताना गार्डनच्या कोपऱ्यावरच्या आंब्याची पावसाळ्यापुर्वीची छाटणी चाललेली दिसत होती. तुटलेली फांदी रस्त्यावर अस्तव्यस्त पसरली होती आणि फांदिवर बांडगुळ टेचात डूलत होतं...
काही दिवसात ती फांदी सुकणार होती..
सोबत ते बांडगुळ सुद्धा...

No comments:
Post a Comment