आजचाच दिवस होता... रंगपंचमी.
वाडीत जोरदार तयारी सुरु होती, रंगपंचमी साजरी करण्यात आमची वाडी गिरगावात अव्वल होती. दोन्ही बाजूला चाळी आणि मधून जाणारा हमरस्ता म्हणजे आमच्यासाठी फुल धम्माल करायची सोय. लहान असताना एक ही माणूस कोरडा जाणार नाही याची काळजी आम्ही घ्यायचो. फुगे पाण्याने भरुन त्याचा अक्षरशः वर्षाव करायचो खालच्या माणसावर. जाम मजा यायची. जरा मोठे झालो आणि मग फुग्यांच्या जागी पिशव्या आल्या. पिशवी धापकन अंगावर पडली की माणूस अर्धा घाबरुनच जायचा, त्यातही तरुणींना भिजवायची मज्जा काही औरच. त्या किंचाळल्या की आम्हाला आणखीनच चेव चढायचा.
पण आता लग्न झालं होतं मागच्या रंगपंचमीत बायको बोलली की, नका ओ असे फुगे, पिशव्या मारु. कोणालातरी भयंकर इजा वगैरे व्हायची, जन्माचं नुकसान व्हायचं. पण तिला त्यावेळी बादलीभर पाणी ओतून बोललो... " बुरा ना मानो होली है.. "
तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. परंतू या वर्षी बाळाच्या आगमनाची तयारी सुरु होती डॉक्टरांनी दिलेली तारीख रंगपंचमी च्या दोन दिवस नंतर ची होती. रात्री होळी लागली. सर्व बच्चा गँग आणि यंगिस्तान मित्र मंडळाची गुप्त बैठक झाली. परंपरेप्रमाणे यावर्षीही एकही माणूस कोरडा नाही गेला पाहीजे असे सर्वानुमते ठरलं. सकाळीच दोन पिंप पाणी भरुन ठेवलेलं नळात. डिजे सुद्धा लागला.. पहिलीच पिशवी माझ्या हातूनच टाकली गेली ती पढाखू गौतम च्या डोक्यात, साला आजपण गार्डन अभ्यासिकेत चाललेला... शिव्या देत चरफडत पुन्हा घरी गेला. अर्धा तास झाला असेल शेजारची विद्यू सांगत आली की दादा तूला आईने लवकर बोलावलंय. वहीनीच्या पोटात दुखतंय.
आलो रे.... असं गँग ला सांगून तडक घरी गेलो. आई दारातच उभी होती. म्हणाली टॅक्सी आण लवकर... वेळ झाली बहुतेक. आई ला बोललो तुम्ही हळूहळू खाली उतरा.. मी तसाच खाली गेलो. फुगे पिशव्या चुकवत नाक्यावर पोचलो. टॅक्सी सुद्धा मिळेना. एकाला दम देऊन थांबवले. तो कसा बसा तयार झाला. टॅक्सी वाडीत घातली. ही फुग्यांची रास पडली...
पण ठोका चुकला.
चाळीच्या दरवाज्यात गर्दी बघून अचानक मनात नको नको ते विचार येऊ लागले. टॅक्सी तून बाहेर पडल्या पडल्या आईच्या रडण्याचा आवाज आला. गर्दी बाजूला करुन पाहतो तर...
बायको खाली पडलेली अर्धी भिजली होती. बाजूलाच फुटलेली पिशवी पडली होती. काय समजायचे ते समजलो. तशीच तिला उचलली. थेट हॉस्पिटल गाठलं.. अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले......
" सॉरी..... डोक्याला मार लागल्याने दोघेही गेले. पडताना बहुतेक त्यांना जिन्याची पायरी लागली. आणि बाळाच्या डोक्यालाही मार लागलाय ".
सुन्न....
उठलो तिथून चालत चालत वाडीत पोचलो. वरुन फुगे येतंच होते. सर्वांगावर सटासट लागत होते. जाणीवा तर गोठल्या होत्या. इतक्यात एक पिशवी साटकन तोंडावर येऊन फुटली....
तोंडावरुन निथळणारे पाणी होते की अश्रू हे कळण्याआधीच.... डोळ्यासमोर अंधार दाटला...

No comments:
Post a Comment